AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेचा उद्यापासून सलग तीन दिवस ब्लॉक, अनेक गाड्या रद्द तर..

मध्य रेल्वे उद्यापासून सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेत आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामाकरिता ब्लॉक घेत आहे. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांचे मोठे हाल होणार हे स्पष्टच आहे.

मध्य रेल्वेचा उद्यापासून सलग तीन दिवस ब्लॉक, अनेक गाड्या रद्द तर..
Mumbai Central Railway
| Updated on: May 14, 2026 | 8:07 AM
Share

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे उद्यापासून सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेत आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि बीजपुरवठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे कुर्ला ते भांडुपदरम्यान काही लोकल सेवांत बदल करण्यात आले तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. गर्डरचे काम रात्री तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकातील इंटरमीडिएट फूटओव्हर ब्रिजच्या गर्डर लाँचिंगसाठी शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार. या ब्लॉकच्या अवधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

आधीच मध्य रेल्वे उशीराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यात ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे होणार हाल होणार हे नक्की आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1.15 ते पहाटे 4.15पर्यंत, शनिवारी रात्री 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत आणि रविवारी मध्यरात्री 1.15 ते पहाटे 3.05 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री 11.30 ते 12.12 वाजेपर्यंत कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

कसाऱ्याहून रात्री 10 वाजल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून सुटलेल्या काही गाड्यांचा प्रवास कुर्ला येथे तर अप दिशेने येणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास ठाणे येथे संपेल. तीन दिवसांच्या ब्लॉक काळात लोकल सेवा कोलमडणार असल्याने नोकरदारांची घरी परतताना गैरसोय होणार आहे.

यादरम्यान काही लोकल प्रशासनाकडून रद्द देखील केल्या जाणार आहेत. ठाणे येथून रात्री 11.40 वाजता सुटणारी ठाणे-कुर्ला लोकल तसेच पहाटे 4.04 वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल ट्रेन रद्द केली जाईल. सीएसएमटीहून रात्री 11.38 आणि 12.24 मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत