AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती अखेर तेच घडलं, पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, इतकेच लिटर इंधन खरेदी करता येणार … या राज्यातील पंपांना आदेश काय?

Fuel Petrol Diesel Rationing : देशात पेट्रोल-डिझेलचे मोठे संकट येण्याची भीती खरी होते की काय? असे आता वाटू लागले आहे. कारण या राज्यात इंधन रेशनिंगच्या वार्ता समोर येत आहे. पंप चालकांसाठी खास आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. आता किती मिळणार पेट्रोल आणि डिझेल?

ज्याची भीती अखेर तेच घडलं, पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, इतकेच लिटर इंधन खरेदी करता येणार ... या राज्यातील पंपांना आदेश काय?
इंधन रेशनिंगने खळबळImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 14, 2026 | 8:41 AM
Share

Petrol And Diesel Rationing in Karalam: मध्यंतरी अचानक देशात पेट्रोल-डिझेल, व्यावसायिक-घरगुती एलपीजी, सीएनजीचा मोठा तुटवडा झाला होता. ग्राहकांच्या प्रत्येक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पण नंतर पुरवठा सुरळीत झाला. तर आता ही केंद्र सरकार दोन महिने पुरेल इतका इंधन साठा देशात असल्याचा दावा करत आहे. पण या राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. या राज्यातील काही वृत्तानुसार इथे पेट्रोल आणि डिझेलचे रेशनिंग सुरू झाले आहे. आता नियमानुसार ग्राहकांना इंधन खरेदी करता येणार आहे.

केरळम राज्यात इंधन रेशनिंग?

केरळम राज्यात पेट्रोल आणि डिझेल खरेदीविषयी नवीन नियम लागू करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे. Mathrubhumi.com ने याविषयीचे वृत्त दिले आहे. केरळम राज्यात आता घाऊक विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल खरेदी करता येईल. तर एका व्यक्तीला 5,000 रुपयांपर्यंत पेट्रोल खरेदी करता येईल. तुटवडा होऊ नये आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. इथल्या पंपांना काही दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलचा एक निश्चित साठा मिळत असल्याचे समोर येत आहे. पुरवठा सुरळीत राहावा आणि तो खंडित होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मातृभूमीच्या वृत्तानुसार, इंधनासाठी पेट्रोल पंप चालकांना आगाऊ रक्कम मोजावी लागत आहे. तर क्रेडिट बेस्ट सिस्टिम बंद करण्यात आली आहे. केरळमध्ये जवळपास 2,500 पेट्रोल पंप आहेत. त्यातील 12,000 ते 24,000 लिटरपर्यंतचे पंप नियमीत इंधन टँकरवर अवलंबून आहेत. शहरातील पेट्रोल पंपावर रोज 10,000 लिटर डिझेलची विक्री होते. तर गावाकडील पंपांवरही डिझेलची अधिक विक्री होते. अधिकची मागणी थोपवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आल्याचे समजते.

इंधन तुटवडा नाही तर अतिरिक्त खरेदीला लगाम

इंधन वितरकांनी एक बाब स्पष्ट केली आहे की, इंधन तुटवडा झालेला नाही. तर अतिरिक्त खरेदीला लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर असे नियम लागू करण्यात आले हे विशेष. केरळम स्टेट पेट्रोलियम ट्रेडर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी राज्यात इंधन तुटवड्याचा दावा खोडून काढला. राज्यात इंधनाचा मुबलक साठा आहे. पण काही लोक नाहक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ठेवत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...