AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Labour codes: हातात कमी येणार पगार, पण… नवीन लेबर कोड लागू, तुमच्या पगारापासून ते ग्रॅज्युएटीपर्यंत काय काय बदल?

New Labour codes 2026 : देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. नवीन कामगार कायद्यानुसार,एका आठवड्यात 48 तास काम करावे लागेल. पण नवीन नियमानुसार पगारात कपात होणार आहे. तर त्याचा फायदा याठिकाणी दिसणार आहे.

New Labour codes: हातात कमी येणार पगार, पण... नवीन लेबर कोड लागू, तुमच्या पगारापासून ते ग्रॅज्युएटीपर्यंत काय काय बदल?
नवीन लेबर कोड लागूImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 13, 2026 | 3:11 PM
Share

New Labour codes 2026 : जुन्या कामगार कायद्यांना एकत्र करत 4 नवीन कामगार संहिता तयार करण्यात आल्या आहेत. नवीन लेबर कोड देशात लागू झाले आहेत. देशातील नोकरदार वर्ग आणि कंपन्यांच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम दिसणार आहे. या बदलांचा थेट पगार, पीएफ, ग्रॅज्युइटी, कामाचे तास आणि सुट्ट्यांवर परिणाम होणार आहे. हातात येणारा पगार कमी होणार आहे. पण या ठिकाणी दुप्पट फायदा होणार आहे. काय होणार आहे या बदलांचा परिणाम?

हातातील पगार कमी होणार

नवीन कामगार संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे एकूण CTC च्या किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे पीएफ आणि ग्रॅज्युइटीसाठीची रक्कम वाढेल. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आजच्या काटकसरीचा मोठा फायदा होईल. तर दुसरीकडे पीएफमध्ये अधिकची रक्कम जमा होणार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा महिन्याचा पगार थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीचा लाभ

नवीन लेबर कोडमध्ये निश्चित करार पद्धतीने काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच हा लाभ देण्यात येत होता. मात्र आता कमी कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा फायदा मिळेल. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल.

4 दिवस काम, 3 दिवस आराम

ज्या कर्मचाऱ्यांना रोजच्या हिशोबाने पैसे मिळत नाही, त्यांच्यासाठी एक खास नियम लागू झाला आहे. त्यांना आता एका दिवशी 12 तास आणि आठवड्यात 48 दिवस काम करावे लागेल. म्हणजे आठवड्यात केवळ 4 दिवस काम करावे लागेल. बाकी 3 दिवसांची सुट्टी असेल.

वेतनाचा नियम काय?

सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

समान कामासाठी स्त्री आणि पुरुषांना समान वेतन मिळेल

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना त्याच दिवशी मजूरी, रक्कम द्यावी लागेल

राजीनामा दिल्यानंतर अथवा काढून टाकल्यानंतर 2 दिवसात त्यांचा हिशोब पूर्ण द्यावा लागेल

ओव्हरटाईम कामावर दुप्पट वेतन द्यावे लागेल.

ग्रॅज्युईटीविषयी मोठा नियम

निश्चित करारावरील कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युइटीचा नियम लागू झाला आहे. आता एका वर्षाच्या नोकरीनंतरही ग्रॅज्युइटी मिळेल. तर नियमित कर्मचाऱ्यांना पाच वर्षांनंतर ग्रॅज्युईटी मिळेल. मूळ वेतनावर आता पीएफ देण्यात येईल. कर्मचारी आणि कंपनी दोघांचे पीएफ योगदान वाढेल. निवृत्तीवेळी बचत वाढेल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?