AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indira Gandhi: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इंदिरा गांधी यांनी किती केले सोने दान? आज त्याची किंमत काय?

Indira Gandhi Gold Donate: 1962 मध्ये भारत चीन युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला राष्ट्रीय सुरक्षा निधीत सोने दान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांच्याकडील काही सोने दान केले होते. किती आहे आज त्या सोन्याची किंमत?

Indira Gandhi: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इंदिरा गांधी यांनी किती केले सोने दान? आज त्याची किंमत काय?
इंदिरा गांधी, सोने दान Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 13, 2026 | 2:11 PM
Share

Indira Gandhi Gold Donate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय जनतेला काटकसरीची त्रिसूत्री सांगितली. पेट्रोल-डिझेलचा कमी आणि काटकसरीने वापर, एक वर्षे सोने खरेदी न करणे, खाद्यतेलाचा कमी वापर करा असे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केले आहे. या तीन गोष्टींसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन खर्च करावे लागत आहे. सध्याच्या आखातातील संघर्ष लांबल्यास त्याचे दूरगामी परिणाम देशावर होतील. त्यामुळे आतापासूनच देशासाठी काटकसरीवर त्यांनी भर दिला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असेच आवाहन देशासाठी केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी करून विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. 1962 वेळी इंदिरा गांधी यांनी किती सोने दान केले याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्राला पंडित नेहरू यांचे आवाहन

1962 मध्ये भारत चीन युद्धाला तोंड फुटले होते. चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. चीनने भारतीय भूभागावर अधिक्रमण सुरू केले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशवासियांना सोने दान करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये सोन्यासह मोठ्या प्रमाणात निधी दान करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. चीन लडाख भागात शिरला होता. अक्साई चीन हा लाल रंगाने व्यापला होता. तरीही चीनच्या कारवाया थांबत नव्हत्या. अखेर भारतीय सैन्याने चीनला चांगला धडा शिकवला. चीनचे सैन्य थांबले. त्यावेळी पंडित नेहरू यांनी केलेल्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

इंदिरा गांधी यांनी सोने केले दान

1962 च्या भारत आणि चीन युद्धावेळी इंदिरा गांधी यांनी सोने दान केले होते. 2009 मध्ये संरक्षण मंत्रालयाने एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले होते. त्यात इंदिरा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 367 ग्रॅम सोन्याचे दागिने दान केल्याचा उल्लेख आहे. राष्ट्रीय सुरक्षा निधीत हे सोने त्यांनी दान केले होते. त्याची आठवण आज विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना आली आहे.

आज या सोन्याची किती किंमत?

बिझनेस टुडेतील वृत्तानुसार,  इंदिरा गांधी यांनी 1962 मध्ये 367 ग्रॅम सोने दान केले होते. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत 14,715 रुपये इतकी आहे. 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 367 ग्रॅम सोन्याची किंमत 54,00,628.87 रुपये इतकी होते. तर एका अंदाजानुसार, 1962 मध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत 11.97 रुपये इतकी होती.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?