Maharashtra News LIVE : आधारभूत किंमत कांद्याला मिळत नाही – खासदार कल्याण काळे
Maharashtra News LIVE : मुंबईत महागाईचा भडका उडायला सुरुवातय. सीएनजी दोन रुपयांनी महागला. मुंबईतील वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीचा ‘कन्सल्टन्सी’ व्यवसाय उघड. आरोपी शुभम खैरनार याचे “SR Education Consultancy” नावाने कार्यालय. उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात सुरू होती एज्युकेशन कन्सल्टन्सी. MBBS, BAMS, BHMS, Engineering प्रवेशासाठी मार्गदर्शनाचा दावा. गेली 2 ते 3 वर्षे सुरू होता व्यवसाय. रजिस्ट्रेशन पासून ॲडमिशन पर्यंत ऑनलाइन ऑफलाईन मार्गदर्शन केले जाईल अशी केली जाहिरात. NEET, JEE, CET परीक्षांबाबत माहिती. मदर डेअरीने फुल क्रीम दूध ६९ रुपयांवरून ७२ रुपये, टोन्ड दूध ५६ रुपयांवरून ५८ रुपये तर म्हशीचे दूध ७५ रुपयांवरून ८२ रुपये प्रति लिटर केले आहे. तसेच डबल टोन्ड दूध ५४ रुपये आणि गाईचे दूध ६२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सातारा शहरातील सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडी परिसराला फटका. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचे नुकसान. या भागात अनेक घरांवर विद्युत पोल आणि झाडे पडली. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये चार महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू
नाशिकमध्ये चार महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खाजगी ट्रॅव्हल्सने इंदापूरहून लग्नासाठी काटेकर कुटुंब आले होते. पहाटे आईला मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
-
आधारभूत किंमत कांद्याला मिळत नाही – खासदार कल्याण काळे
आधारभूत किंमतीचा भाव कांद्याला मिळत नाही, सरकार उघड्या डोळ्याने तमाशा पाहत आहे अशी टीका खासदार कल्याण काळे यांनी केली आहे. लासुर बाजार समिती समोर शेतकऱ्याने गेटवर कांदा टाकल्या प्रकरणातही खासदार कल्याण काळे यांनी सरकारवर टीका केली आहे.या प्रश्नांवर सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे असेही खासदार कल्याण काळे यांनी म्हटले आहे.
-
-
हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला म्हणून गुंडांची कीर्तनकार महाराजांना अमानुष मारहाण
बीड- गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला म्हणून पाच ते सात गावगुंडांकडून गावातील कीर्तनकार महाराजांना अमानुष मारहाण केल्याची घटना बीड येथे घडली आहे. कैलास राजेंद्र आनंदे महाराज या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
-
वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी
वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. मिल क्वालिटी सोयाबीनला ७ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बिजवाई सोयाबीनला तब्बल ८ हजार ६०० रुपयांचा दर मिळत आहे. चार वर्षांनंतर सोयाबीनचे दर सात हजारांच्या पुढे गेले आहेत.
-
लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे येवला बस आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ
नाशिक : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे येवला बस आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या २० दिवसांत आगाराला १ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दररोज ४२ बसेसद्वारे सुमारे २४० फेऱ्या येथे होत आहेत. येवला बस स्थानकातून दररोज ६०० ते ६२५ एसटी बसची ये-जा होत आहे. दररोज १३ ते १४ हजार प्रवासी एसटीने प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
-
-
राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी दिला पक्षाचा राजीनामा
ठाणे : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज रोजी पक्षाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना सोपविला आहे. पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या पक्षाचे आभार मानत राजीनामा स्वीकारावा अशी विनंती आनंद परांजपे यांनी राजीनामा पत्रामध्ये केली आहे.
-
वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी
वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी
मिल क्वालिटी सोयाबीनला ७ हजार ८०० रुपयांपर्यंत दर
बिजवाई सोयाबीनला तब्बल ८ हजार ६०० रुपयांचा दर
चार वर्षांनंतर सोयाबीनचे दर सात हजारांच्या पुढे
दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक?
बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दरात केली होती विक्री
आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता
-
रांजणगावमध्ये एसटीचा भीषण अपघात
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे महागणपती मंदिरासमोर एसटी बसने गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच वाहनाचं देखील नुकसान झालं आहे.
-
ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारती, प्रशासनाच्या नागरिकांना नोटीसा
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक, धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली आहे. ठाणे पालिका हद्दीत तब्बल ४ हजार ४३७ इमारती धोकादायक असून, यातील 93 इमारती या अति धोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारतींना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत, पावसाळा सुरू होण्यापूर्वी इमारती खाली कराव्यात असं नोटीसीमध्ये म्हटलं आहे.
-
गोंदिया आणि तिरोडा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार
गोंदिया आणि तिरोडा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार
पुरवठा विभागाने 7 गॅस सिलिंडर केले जप्त
तिरोड्यात सहा सिलिंडर जप्त
तर गोंदियात एक घरगुती सिलिंडर जप्त
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची धडक कारवाई.
पोलिसात तक्रार दाखल.
-
नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा
नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा. मात्र, माहूर तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून पासून वंचित. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पीक विमा मिळाला नाही, शेतकऱ्यांचा आरोप. माहूर तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
-
ठाण्यात 2 रुपयांनी CNG महागल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजी
ठाण्यात 2 रुपयांनी CNG महागल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजी. CNGचे दर कमी करा, नाहीतर मीटरमध्ये वाढ करण्याची रिक्षाचालकांची मागणी. CNGचे दर वाढल्यानं रिक्षा चालवणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया
-
साताऱ्यात शिवसागर जलाशयात बोट बुडाली, चालक बेपत्ता
साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बोट बुडाली… बोटीत असलेल्या दोन्ही पर्यटकांना सुखरुप बाहेर काढलं… शिवसागर बोटीचा चालक मात्र बेपत्ता असल्याची माहिती…
-
हडपसरमध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक
पुण्यातील हडपसर परिसरातील रूग्णालयात आढळली होती बॉम्बसदृश वस्तू. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ICUच्या बाजूलाच बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यात आली होती. मोकळ्या मैदानात नेवून बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात आली
-
मंत्र्यांना गाड्यांचा अर्धा ताफा तरी कशाला, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास लाज वाटते का ? – खासदार वर्षा गायकवाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व मंत्री त्याकडे कानाडोळा करत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पण मुंबई सारख्या शहरात मेट्रो, बेस्ट, लोकल रेल्वे सेवा आहे तर इतर शहरातही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. मुंबईला येताना व इतर प्रवास करण्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेस वापरून ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका अंगिकारावी आणि देशभक्ती दाखवावी,असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
नंदुरबार जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले. शहरातील १२ पैकी अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी वाढली. ऑइल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांकडून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-
NEET घोटाळ्यावरून संभाजीनगरात NSUI आक्रमक
NEET घोटाळ्यावरून संभाजीनगरात NSUI आक्रमक झाली. क्रांती चौकात जोरदार निदर्शने देण्यात आली. केंद्र राज्य सरकारमधील शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. खासदार कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारच अपयश झाकण्यासाठी पेट्रोल – डिझेल, सोने खरेदी करू नका असे आवाहन पंतप्रधानांना करावं लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
-
नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा
नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा मिळाला पण माहूर तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून पासून वंचित आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पीक विमा मिळाला नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. माहूर तालुक्यात पिकांच मोठं नुकसान झाले होते. माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
-
आमचं मोठं नुकसान -सराफा व्यावसायिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने चांदीचे खरेदी न करण्याच्या केलेल आवाहन मोठा नुकसानकारक असल्याचे जळगावच्या ग्रामीण भागातील सराफ व्यवसायिकांनी म्हटलं आहे. नागरिकांनी वर्षभर सोने चांदीची खरेदी थांबवली, मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.मोदींनी घेतलेला निर्णय देशासाठी खरोखर चांगला आहे, मात्र हे आवाहन करताना मोदींनी सराफ व्यावसायिक आणि यावर अवलंबून कामगारांचा विचार करायला हवा होता
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहन नंतर बदलापुरात शरद पवार गट आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना, पेट्रोलचा वापर जपून करा, सोन्याची खरेदी करु नका असं आवाहन केलं होतं. शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी चक्क बैलगाडी मधून प्रवास करत नगरपालिका गाठली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्ष देखील बैलगाडी किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्यात यावा असे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. नगरपालिकेत बाहेर शरद पवार गट आणि अधिकारी सोबत बाचाबाची झाली.
-
विधानभवनात फडणवीसांची बाईकने एंट्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बाईकवरून विधानभवनात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री हे डोक्यावर हेल्मट घालून बाईकने विधान भवनात दाखल झाले.
-
विरोधकांचं दुटप्पी वागणं योग्य नाही- फडणवीस
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही कठोर निर्णय घेतले नाहीत. विरोधकांचं दुटप्पी वागणं योग्य नाही. आम्ही आमच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणार नाही. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी विधानभवनात बाईकने आलो. टीका करणारे बिनडोक आहेत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
‘नीट’ पेपरफुटीवरून संभाजीनगरात NSUI आक्रमक; जोरदार निदर्शनं
NEET घोटाळ्यावरून संभाजीनगरात NSUI आक्रमक झाली असून क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारमधील शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार कल्याण काळे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारचं अपयश झाकण्यासाठी पेट्रोल – डिझेलचा वापर कमी करा, सोने खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधानांना करावं लागत असल्याची टीकाही काळेंनी यावेळी केली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहननंतर बदलापुरात शरद पवार गट आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहननंतर बदलापुरात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेलचा वापर जपून करा, सोन्याची खरेदी करु नका असं आवाहन केलं. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी चक्क बैलगाडीमधून प्रवास करत नगरपालिका गाठलं आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनीही बैलगाडी किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करत याव, असं निवेदन त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलं. यानंतर नगरपालिकेबाहेर शरद पवार गट आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.
-
जालना जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता; फळबागा सुकल्याने शेतकरी चिंतेत
जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली असून तापमानाचा पारा 42 अंशावर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु-मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा पाण्याअभावी सुकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची दाहकता बदनापूर तालुक्यात पाहायला मिळत असून मोसंबी पेरू यासह इतर अनेक फळबागा सुकल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
-
विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी
विधानभवनात विधान परिषदेच्या दहा नवनियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला. बच्चू कडू, अंबादास दानवे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यामध्ये बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि एक पोटनिवडणुकीतील विजयी सदस्याचा समावेश आहे.
-
बीडमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 75 वर्षीय नराधमाचा अत्याचाराचा प्रयत्न
बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकलीवर 75 वर्षीय नराधमाने आपल्या घरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार चिमुकलीच्या वडिलांनी पाहिल्याने घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईक चालवत विधानभवनात दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले आहेत. इंधन बचत या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनानंतर अनेक मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनेही कमी करण्यात आली आहेत. अशातच फडणवीस यांनीसुद्धा बाईकचा आधार घेतला आहे.
-
नितीन गडकरींचा मोठा निर्णय, सोलापूर दौऱ्यात ताफ्यातील वाहनात 50 टक्के कपात
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यादरम्यान व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट येथील विकासकामांच्या पाहणीसाठी आणि भूमिपूजनासाठी ते आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, प्रशासनाकडून केवळ ३ वाहनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. यामध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी-तहसीलदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रत्येकी एक वाहन समाविष्ट असेल. याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शक्य तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अवलंब करणे, कार्यालयीन कामासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ, RPI कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची हत्या
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात आरपीआय (RPI) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोशी येथील युवराज रेस्टॉरंट अँड बारमध्ये काल रात्री नऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. सध्या मोरे यांचा मृतदेह वायसीएम (YCM) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, जोपर्यंत पोलीस मारेकऱ्यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
-
नागपूर विमानतळाचा होणार कायापालट; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नागपूर विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दिल्लीत प्रलंबित असलेली विकासाची फाईल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर विमानतळाची प्रवासी क्षमता टप्प्याटप्प्याने वार्षिक ३ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्या टप्प्यात ती ४० लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या विस्तारामुळे विदर्भातील कनेक्टिव्हिटीला जागतिक दर्जा प्राप्त होईल, ज्यामुळे केवळ उद्योग आणि व्यापारालाच नव्हे तर शेतमालाला देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मिहान इंडिया लि. च्या जमिनीचा लीज कालावधी वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, यामुळे नागपूर आता मध्य भारतातील विमान वाहतुकीचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.
-
महापौर रवी लांडगेंचा काटकसरीचा मंत्र; पालिकेच्या सभेला सायकल किंवा मेट्रोने येण्याचे नगरसेवकांना आवाहन
पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या धोरणाचा आदर्श घेत एक नवा पायंडा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. आपला प्रस्तावित परदेश दौरा रद्द केल्यानंतर, महापौरांनी आता महापालिकेच्या उद्या (१५ तारखेला) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी अनोखे आवाहन केले आहे. सभेला येताना ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकल, सार्वजनिक बस, मेट्रो किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी हा पुढाकार घेतल्याचे महापौरांनी सांगितले असून, त्यांच्या या आवाहनाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
-
नितीन गडकरींचा पालखी मार्गाचा पाहणी दौरा; ताफा सोडून बसने करणार प्रवास
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे, इंधन बचत करणे आणि प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने गडकरी यांनी आपल्या नेहमीच्या मोठ्या ताफ्याऐवजी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यादरम्यान ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाट आणि निरा कॅनल ब्रिज या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन कामाच्या दर्जाची आणि प्रगतीची पाहणी करतील.
-
साताऱ्यात शिवसागर जलाशयात बोट उलटली; दोन पर्यटक बचावले, चालक बेपत्ता
सातारा जिल्ह्यातील बामनोली जवळील शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, या अपघातात दोन्ही पर्यटक पोहून सुखरूप बाहेर पडले आहेत. मात्र, शिवसागर बोट क्लबचा चालक रुपेश धोंडीबा तांबे हा अद्याप बेपत्ता आहे. सावरी येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी हा अपघात झाला. आज सकाळपासून बोट क्लबच्या सभासदांकडून चालकाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात येत असून पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
धुळीच्या साम्राज्यावर मनपाची कारवाई! १७९ बिल्डरांना नोटिसा
बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली करणाऱ्या तब्बल १७९ बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने महापालिकेकडे येत होत्या. त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
जेवण वाढण्याचा वाद झाल्याने लग्नसमारंभात तुफान मारहाण
जालन्यातील बदनापूर तालुक्यात लग्नसमारंभात किरकोळ वादातून तुफान मारहाण झाली आहे.बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे हा प्रकार घडला आहे.या प्रकरणी तीन जणांविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे लग्न सोहळा होता.गावातील एका शेतात हा कार्यक्रम होता.यावेळी जेवण वाढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला.सुरुवातीला दोन्हीही गटात शाब्दिक चकमकी झाल्या.नंतर दोन्हीही गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली.दोन्हीही गटातील लोकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी दौरा
इंधन बचत आणि प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी गडकरी यांनी या दौऱ्यात आपल्या नेहमीच्या मोठ्या ताफ्याऐवजी बसने प्रवास करणार. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाट,निरा कॅनल ब्रीज या ठिकाणी पहाणी करणार….
-
गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गाव महिनाभरापासून अंधारात
गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गावात महिनाभरापासून दररोज 18 तास वीज खंडित असल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. संतप्त गावकऱ्यांनी गेवराई येथील महावितरण अभियंत्यांच्या कार्यालयात सलग 4 तास ठिय्या मांडला. भाजप नेते रोहित पंडित यांच्या मध्यस्थीनंतर महावितरण उपअभियंत्यांनी वीज पुरवठा सुरू करण्याचे लेखी पत्र दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
-
गडचिरोली जिल्ह्यासाठी 48 हजार लिटर केरोसीन मंजूर
संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करू उद्भवणाऱ्या जोखीम निराकरणासाठी_ स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी आता पुन्हा दीर्घकाळानंतर केरोसीन वाटप होणार. गडचिरोली चामोर्शी धानोरा सिरोंचा आरमोरी कुरखेडा कोरची या सात तालुक्यासाठी मंजुरी मिळाली. अंतोदय राशन कार्ड व प्राधान्य कुटुंब राशन कार्ड या दोन लाभार्थ्यांना मिळणार केरोसीन. आतापर्यंत फक्त मंजुरी मिळाली असून केरोसीना अध्याप उपलब्ध झालेल्या नाही
-
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
हडपसर ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार. त्याचबरोबर अक्कलकोट येथे मोहोळ ते वळसंग राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावणार. अक्कलकोट येथील एसटी स्टॅन्ड आवारात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 134 किमीच्या 1 हजार 232 कोटींच्या महामार्गाचे भूमिपूजन आज पार पडणार आहे
-
गडचिरोली जिल्ह्यासाठी 48 हजार लिटर केरोसीन मंजूर
गडचिरोली जिल्ह्यासाठी 48 हजार लिटर केरोसीन मंजूर. सात तालुक्यात वितरण प्रणाली अंतर्गत वाटप होणार. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करू उदभवणाऱ्या जोखीम निराकरणासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी आता पुन्हा दीर्घकाळानंतर केरोसीन वाटप होणार. गडचिरोली चामोर्शी धानोरा सिरोंचा आरमोरी कुरखेडा कोरची या सात तालुक्यासाठी मंजुरी मिळाली. अंतोदय रेशन कार्ड व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड या दोन लाभार्थ्यांना मिळणार केरोसीन.
-
महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा वाढला
राज्यात उष्णतेची लाट. पुढील काही दिवस नागरिकांची परीक्षा. मुंबईत तापमान ३५ ते ३६ अंशापर्यंत वाढणार. दमट हवामानामुळे उष्णता जास्त जाणवेल. वारंवार पाणी पिण्याचा आरोग्य विभागाचा सल्ला . पुढील ५ दिवस पावसाची शक्यता नसल्याची IMD ची माहिती. राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंशांच्या पार. अकोला आणि नंदुरबार राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हे. अकोला, नंदुरबारमध्ये ४५.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद. अकोल्यात काही ठिकाणी तापमान ४५.६ अंशांपर्यंत पोहोचले. नाशिकच्या निफाड आणि मालेगावमध्येही पारा ४३ अंशांच्या वर.
-
जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू
वाढत्या तापमामुळे जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील २० वर्षीय तरुणीचा तर अमळनेर तालुक्यातील बहादरपुर येथील ६९ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. वैशाली सुनील मोरे असे मयत तरुणीचे नाव असून श्रीहरी प्रभाकर दीक्षित असे मृत्यू झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. तरुणीला उष्माघाताची लक्षणे दिसल्याने प्राथमिक उपचार करून जळगावला पाठविले. मात्र शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
-
टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या मोठा फैसला
जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण. निर्णय राखून ठेवला. चौघा आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी. लैंगिक अत्याचार, छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांवर न्यायालयाची नजर. तौसीफ अत्तार अद्याप पोलीस कोठडीत. इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत. गेल्या अनेक दिवसांच्या जोरदार कायदेशीर खडाजंगीनंतर निकालाचा क्षण जवळ.
-
मदर डेअरीने दुधाचे दर वाढवले
मदर डेअरीने फुल क्रीम दूध ६९ रुपयांवरून ७२ रुपये, टोन्ड दूध ५६ रुपयांवरून ५८ रुपये तर म्हशीचे दूध ७५ रुपयांवरून ८२ रुपये प्रति लिटर केले आहे. तसेच डबल टोन्ड दूध ५४ रुपये आणि गाईचे दूध ६२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.
-
मुंबईत सीएनजी महागला
मुंबईत महागाईचा भडका उडायला सुरुवात. सीएनजी दोन रुपयांनी महागला. मुंबईतील वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ १३ मे च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. नव्या दरानुसार मुंबईत सीएनजीचा दर आता ८४ रुपये प्रतिकिलो आहे.
Published On - May 14,2026 8:19 AM
