Women Health : हेल्दी लाईफस्टाईलसाठी महिलांनी ‘या’ 6 चाचण्या अवश्‍य कराव्यात! जाणून घ्या

महिलांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. परंतु महिला त्यांच्या रोजच्या कामात इतक्या व्यस्त असतात, की त्यांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो. परंतु आज या लेखातून काही चाचण्यांची माहिती देणार आहोत, ज्यातून अनेक आजारांची माहिती मिळू शकते.

Women Health : हेल्दी लाईफस्टाईलसाठी महिलांनी ‘या’ 6 चाचण्या अवश्‍य कराव्यात! जाणून घ्या
आरोग्याची काळजी घ्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:37 AM

पुरुषांच्या तुलनेत महिलांना (Women) अनेक शारीरिक समस्या भेडसावत असतात. त्यातच गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक आमुलाग्र बदल होत असतात. वाढत्या वयासोबत काही व्याधींचा त्यांना त्रास होत असतो. परंतु कुटुंबाची जबाबदारी, धावपळीचे जीवन, महिला नोकरदार असेल तर कामाचा ताणतणाव (Work stress) आदी विविध कारणांमुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशा वेळी वाढत्या वयात त्यांना अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असतात. वेळीच त्याचे निदान न झाल्यास पुढे याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. अशा काही चाचण्या (medical tests) आहेत, ज्यांच्या माध्यमातून काही आजार गंभीर होण्यापूर्वी त्याचा शोध घेतला जाउ शकतो. याबाबत या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

पॅप स्मिअर टेस्ट

पॅप स्मिअर टेस्ट एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. याचा उपयोग साधारणत: सर्वाइकल कँसरसाठी केला जात असतो. परंतु मुख्यत गर्भाशयातील ग्रीवामधील कँसर किंवा कँसरच्या पेशींच्या उपस्थितीबाबत माहिती उपलब्ध होण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

पेल्विक टेस्ट

पेल्विक टेस्ट महिलांच्या योनी, गर्भाशय ग्रीवा, गर्भाशय, फेलोपियन ट्युब, अंडाशय आणि मलाशयाची एक शारीरिक चाचणी असते. यात योनीच्या बाहेरील भागाची तपासणी होत असते. त्यानंतर बाकीच्या शरीराची तपासणी करण्यात येत असते.

मॅमोग्राम

मॅमोग्राम एक प्रकारची एक्स-रे चाचणी असते. यात महिलांच्या स्तनांची चाचणी केली जात असते. यातून स्तनांच्या कँसरची माहिती मिळत असते. या चाचणीच्या आधारे स्तनाच्या कँसरचे लवकर निदान होत असते. महिलांना स्तनांसंबंधित काही समस्या असल्यास ही चाचणी केली जात असते.

थायरॉइड फंक्शन टेस्ट

थायरॉईड फंक्शन टेस्ट ही नियमित पध्दतीने करत राहिली पाहिजे. या टेस्टच्या माध्यमातून शरीरातील थायरॉइड ग्रंथी व्यवस्थीत आहेत की नाही, याची माहिती मिळत असते.

लिपिड पॅनल टेस्ट

हृदयासंबंधित आजारांची माहिती मिळवण्यासाठी ही चाचणी अतिशय महत्वाची असते. या चाचणीमध्ये विशेष पध्दतीने रक्त चाचण्यांच्या संयोजनाचाही सहभाग असतो. या चाचणीच्या माध्यमातून आपल्या रक्तातील चार पध्दतीच्या लिपिडच्या स्तरांचे मोजमाप केले जात असते.

रक्तदाब तपासणी

ब्लड प्रेशर टेस्ट म्हणजेच रक्तदाब तपासणी नियमित स्वरुपात करणे गरजेचे आहे. जर कुणाला थकल्यासारखे, कमकुवत वाटले तसेच चक्कर येणे, जीव घाबरल्यासारखं होणं आदी समस्या असल्यास ही चाचणी करण्यात येत असते.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.