महिलांनो सावधान! तिशीपूर्वीही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, शरीरातील ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

कमी वयात स्तनाचा कर्करोग होत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तिशीपूर्वी देखील ब्रेस्ट कॅन्सरा धोका असून शकतो. जाणून घ्या सविस्तर

महिलांनो सावधान! तिशीपूर्वीही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, शरीरातील ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
Breast cancer
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 6:03 PM

आजच्या धावपळीच्या जीवनात महिला घर, करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातही स्तनाच्या कर्करोगाविषयी म्हणायचे झाले तर बहुतेक महिलांना वाटते की हे केवळ जास्त वयाच्या महिलांनाच होते. पण तसे नाही आहे. तरुण महिलांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. तरुण वयात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असला तरी, शरीरातील कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करणे ही एक गंभीर चूक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये, तरुण महिलांमध्ये वयाच्या ३० वर्षांपूर्वीच स्तनाचा कर्करोग आढळून आला असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

सावधगिरी बाळगण्यासाठी, आपल्या स्तनांच्या सामान्य आकार, रूप आणि स्पर्शातील बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला स्तनात किंवा काखेत गाठ जाणवत असेल, स्तनांचा आकार अचानक बदलत असेल, त्वचेवर खड्डे किंवा खोलगटपणा दिसत असेल, किंवा निप्पल आतल्या बाजूला वळू लागले असतील, किंवा असामान्य स्त्राव होत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Loading...

फॅमिली हिस्ट्री हलक्यात घेऊ नका
जर कुटुंबातील आई, बहीण किंवा मुलीला स्तनाचा किंवा अंडाशयाचा कर्करोग झाला असेल, विशेषतः लहान वयात, तर याचा तुमच्या रिस्कवर परिणाम होऊ शकतो. BRCA1 आणि BRCA2 सारख्या विशिष्ट जनुकांमधील बदलांमुळे देखील ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र, कुटुंबात कोणाला कॅन्सर नाही तर त्याचा अर्थ असा नाही की आजाराचा धोका पूर्णपणे नाहीसा होतो.

स्वतःच स्वतःवर ठेवू शकता लक्ष
महिला वेळोवेळी आरशासमोर उभे राहून आपल्या स्तनांमधील नवीन बदलांचे निरीक्षण करू शकतात. अंघोळ करताना किंवा झोपून हळुवारपणे आपले स्तन आणि काख तपासावे. याचा उद्देश कर्करोग शोधणे हा नसून, आपले शरीर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हा आहे, जेणेकरून काही नवीन बदल लक्षात आल्यास वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधता येतो.

वयावर अवलंबून राहू नका
तरुण स्त्रियांच्या ब्रेस्ट टिश्यू अधिक घन असतात, ज्यामुळे काही विशिष्ट चाचण्यांद्वारे त्यातील बदल शोधणे कठीण होते. म्हणून, जर तुम्हाला गाठ किंवा असामान्य बदल आढळले तर केवळ तुम्ही तरुण आहात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

निरोगी जीवनशैली देखील महत्त्वाची
नियमित व्यायाम, संतुलित आहार, निरोगी वजन राखणे आणि मद्यपान टाळणे यांमुळे केवळ स्तनाच्या कर्करोगाचाच नव्हे, तर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us