Side Effects of Work From Home : तुम्हीसुद्धा सतत करता का घरून काम ? जाणून घ्या वर्क फ्रॉम होमचे तोटे

कोरोनाकाळापसून जगभरात घरून काम करण्याचे अर्थात वर्क फ्रॉम होमचे कल्चर वाढले आहे. मात्र सतत घरून काम करण्याचे काही तोटेही आहेत, ते जाणून घेऊया.

Side Effects of Work From Home : तुम्हीसुद्धा सतत करता का घरून काम ? जाणून घ्या वर्क फ्रॉम होमचे तोटे
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 03, 2023 | 5:20 PM

नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : कोरोना (corona) महामारीनंतर आपल्या जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत. खासगी आयुष्यासोबतच आपल्या प्रोफेशनल आयुष्यातही बरेच बदल झाल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमने (Work from home) तारले. मात्र त्यानंतरही कित्येक लोकांचे घरून काम करणेच सुरू आहे. जगभरात आणि भारतातही आज अनेक जण वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम करता. अनेक कंपन्या आणि ऑफीसेस याच पद्धतीने कार्यरत आहेत.

पण सातत्याने वर्क फ्रॉम होम केल्याने आपल्या तब्येतीचेही बरेच नुकसान होत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. घरातून काम केल्याने लोकं बराच काळ एकाच जागी बसले राहतात, ज्यामुळे हाडं, स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास किंवा त्यांच्याशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. तुम्हीही सातत्याने वर्क फ्रॉम होम करत असाल, तर त्याचे तोटेही जाणून घ्या.

शारीरिक हालचाल होते कमी

वर्क फ्रॉम हो किंवा घरातून काम केल्यामुळे, लोकं बराच काळ डेस्क किंवा सोफ्यावर बसतात, ज्यामुळे अनेकदा शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण होतो. अशा वेळी, शारीरिक हालचालींच्या अभावामुळे, हाडं कमकुवत होणं तसेच आरोग्या इतर समस्या उद्बवू शकतात.

सूर्यप्रकाशाचा अभाव

घरात बसून काम केल्यामुळे लोक बराच वेळ घरातच राहतात. कामामुळे बाहेर पडणं शक्य होत नाही व सूर्यप्रकाशाशी संपर्क येत नाही, जे व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

खराब पोझिशन

काही लोकं घरातून काम तर करतात, पण त्यांच्याकडे त्यासाठी लागणारा योग्य सेटअप नसतो. त्यामुळे एकाच जागी बराच वेळ चुकीच्या पद्धतीने बसून काम करावे लागते. ज्यामुळे हाडांवर आणि स्नायूंवर दाब पडतो व त्यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

पाठीच्या कण्याला होता त्रास

बसण्याची पोझिशन चुकीची असेल, विशेषत: खुर्चीवर बसताना पोझिशन चुकत असेल तर पाठीच्या कण्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पाठ दुखी आणि इतर समस्या उद्बवू शकतात.

हाडांची घनता कमी होणे

बराच काळ वर्क फ्रॉम होम किंवा घरून काम केल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)