Rekha Video Viral: वयाच्या 71 व्या रेखा यांनी उरकलं लग्न! सर्वांसमोर म्हणाल्या, मी विवाहित… व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का
Rekha Video Viral: मी विवाहित आहे..., रेखा यांनी कोणासोबत केलंय लग्न? वयाच्या 71 व्या वर्षी मोठा खुलासा, चाहत्यांना देखील बसला मोठा धक्का... सध्या रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...

Rekha Video Viral: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. रेखा यांचं नाव बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं… पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असतानाच मुकेश यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं… पण आता रेखा यांनी लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मी विवाहित आहे.. असं रेखा म्हणाल्या आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सांगायचं झालं तर, रेखा यांना नुकताच अभिनेत्री महिमा चौधरी स्टारर ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान स्पॉट करण्यात आलं… सिनेमा आज म्हणजे 19 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे… सध्या सोशल मीडियावर रेखा आणि महिमा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे… व्हिडीओमध्ये दोघी अभिनेत्री दुसऱ्या लग्नाबद्दल संवाद साधताना दिसत आहेत… अशात रेखा यांनी केलेल्या वक्तव्याने चाहते हैराण झाले आहेत.
रेखा यांचा लग्नाबद्दलचा अनोखा दृष्टिकोन
व्हायरल व्हिडीओमध्ये महिमा विनोदी अंदाजात म्हणते, ‘माझं दुसरं लग्न झालं आहे…’ यावर रेखा म्हणतात, ‘लग्न पहिलं असो किंवा दुसरं… लग्न तर मी केलं आहे, जीवनाशी… लग्न हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. प्रेम आहे तर लग्न आहे आणि लग्न आहे तर प्रेम आहे…’ रेखा यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… व्हिडीओ वर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट देखील केली आहे… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एकेकाळी चर्चेत होतं रेखा यांची लव्हलाईफ…
बॉलिवूडमध्ये सक्रिय असतानाच नाही तर, आता देखील रेखा यांचं खासगी आयुष्य चर्चेत असते… अनेकांसोबत रेखा यांचं नाव जोडण्यात आलं. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या रेखा यांच्या नात्याची आजही चर्चा रंगलेली असते… एकवेळ अशी आली जेव्हा बिग बी यांनी रेखा यांना सर्वांसमोर स्वीकारण्यास नकार दिला…
अशात ऐकट्या पडलेल्या रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही… अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाला जवळपास सहा महिने झाल्यानंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला. पण घटस्फोट होण्याआधीत रेखा यांच्या पतीने आत्महत्या केली… त्यानंतर रेखा यांनी दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही.
