‘या’ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कमी होईल ऐकण्याची क्षमता

| Updated on: Mar 03, 2022 | 1:11 PM

भारतीय उपखंडातील सुमारे 63 दशलक्ष लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याची गंभीर समस्या आहे. या आकडेवारीत बालपणातील बहिरेपणाची समस्या असलेल्यांची संख्या सुमारे 22 दशलक्ष आहे. ही समस्या लक्षात घेता, श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे, उपाय व निदान जाणून घेणे आवश्‍यक आहे.

‘या’ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कमी होईल ऐकण्याची क्षमता
कानाशी निगडीत ही काही लक्षणे जाणवताच चुकूनही करू नका दुर्लक्ष
Follow us on

जागतिक श्रवण दिवस (World Hearing Day) दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. बहिरेपणाच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे आणि त्याच्या धोक्यांबद्दल माहिती देणे हा त्याचा उद्देश आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, आजच्या काळात 400 दशलक्ष लोक ज्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे, याचे मोठे कारण म्हणजे लोक त्यांच्या कानात होणाऱ्या सामान्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. या समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास बहिरेपणा (Deafness) येऊ शकतो. पारस हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. अमिताभ मलिक यांनी ‘टीव्ही9’ ला सांगितले, की बहिरेपणाचा समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. कानाच्या कोणत्याही समस्यांमुळे बहिरेपणा येऊ शकतो. याशिवाय अनेकांना जन्मापासून आणि वृद्धापकाळात बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो.

डॉ. मलिक म्हणतात, की वृद्धत्व आणि ‘प्रेसबायक्यूसिस’ ही भारतातील श्रवणशक्ती कमी होण्याची दुसरी सर्वात सामान्य कारणे आहेत. याशिवाय याचा ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणामुळे अनेक ठिकाणी बहिरेपणा येतो. जे लोक जास्त गोंगाटात राहतात त्यांना ही समस्या जास्त दिसून येते. नेहमी मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यानेही बहिरेपणा येऊ शकतो. सर्दीमुळे कानात संक्रमण होऊ शकते जे ऐकण्यावर परिणाम करू शकते. डीवाय पाटील हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. योगेश दाभोळकर म्हणतात, की भारतीय उपखंडातील सुमारे 63 दशलक्ष लोक गंभीर ऐकण्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. या आकडेवारीत बालपण बहिरेपणाचा वाटा सुमारे 22 दशलक्ष आहे. या समस्येमुळे मुलांना बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. भारतात जन्मजात बहिरेपणाची अनेक कारणे आहेत.

बहिरेपणाची लक्षणे

तज्ज्ञांच्या मते बहिरेपणा हा हळूहळू सुरू होतो आणि तो वाढतच जातो. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी दुरून बोलत असेल आणि तुम्हाला त्याचे ऐकण्यास त्रास होत असेल तर समजून घ्या की ही बहिरेपणाची सुरुवातीची लक्षणे आहेत. कधी कधी ऐकू येते पण काही शब्द स्पष्ट समजत नाहीत. कोणी फोन केला तर कुठल्या दिशेकडून आवाज येतोय हे कळणे अवघड होते. ही सर्व बहिरेपणाची लक्षणे आहेत. याची वेळीच काळजी घेतली नाही तर ऐकण्याची क्षमताही पूर्णपणे नष्ट होऊ शकते. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉ. योगेश यांच्या म्हणण्यानुसार, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. बहिरेपणा लवकर ओळखणे आणि त्यावर वेळेत उपचार केल्यास त्यामुळे निदान 40 टक्के लोकसंख्येला बहिरेपणाचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. रुबेला आणि मेंदुज्वराच्या लसीकरणाने मुलांमधील ही समस्या टाळता येऊ शकते.

World Hearing Day 2022 Do not ignore the problem in the ear, it can lead to deafness