World Kidney Day 2023 : किडनी ट्रान्सप्लांट करताय ? डोनरच्या आरोग्यावर काय होतो परिणाम ते तर आधी जाणून तर घ्या

| Updated on: Mar 09, 2023 | 11:17 AM

किडनी निकामी झाल्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटची गरज झपाट्याने वाढत आहे. शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो.

World Kidney Day 2023 : किडनी ट्रान्सप्लांट करताय ? डोनरच्या आरोग्यावर काय होतो परिणाम ते तर आधी जाणून तर घ्या
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : किडनी (kidney) हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. किडनी ही केवळ इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखत नाही तर त्यामुळे आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास देखील मदत होते. मात्र जेव्हा शरीरातील दोन्ही किडनी त्यांचे काम योग्यपणे करू शकत नाहीत, तेव्हा त्या व्यक्तीला प्रत्यारोपणाची म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांटची (kidney transplant) गरज भासते. किडनीचे शरीरातील महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरूवारी ‘वर्ल्ड किडनी डे’ ( World Kidney Day) साजरा करण्यात येतो.

किडनी ट्रान्सप्लांट का केले जाते ?

ज्या व्यक्तीची किडनी निकामी होते त्यांना सहसा डायलिसिस करावे लागते, हा एक प्रकारचा उपचार आहे. जेव्हा डायलिसिसमुळे देखील रुग्णाला मदत होत नाही तेव्हा किडनीच्या प्रत्यारोपणाची अर्थाच ट्रान्सप्लांटची आवश्यकता असते. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील एक किंवा दोन्ही किडनी काढून टाकल्या जातात आणि त्याऐवजी दाताकडून किडनी दिली जाते.

हे सुद्धा वाचा

किडनी ट्रान्सप्लांट मध्ये काय होते ?

ट्रान्सप्लांटमुळे रुग्णाला डायलिसिस किंवा औषधे यांचा वापर टाळण्यास मदत होते आणि अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोकाही टाळता येतो. प्रत्यारोपणानंतर एखादी व्यक्ती चांगले, निरोगी जीवन जगू शकते. पण किडनी ट्रान्सप्लांट प्रत्येक व्यक्तीसाठी अनुकूल ठरेलच, सूट होईलच असे नाही. यामध्ये सहसा अशा लोकांचा समावेश होतो जे संसर्गाने ग्रस्त आहेत किंवा ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांना याचा फायदा होतोच असे नव्हे.

किडनी ट्रान्सप्लांट प्रक्रियेनंतर अनेकांना रक्तस्त्राव, संसर्ग आणि वेदना यांचा सामना करावा लागतो, परंतु या समस्या सहजपणे हाताळल्या जातात. 5% रुग्णांमध्ये (शरीर किडनी नाकारण्याचा) धोका देखील असतो, जो प्रत्यारोपणानंतर पहिल्या सहा महिन्यांत जास्त असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते औषधांसह मॅनेज केले जाते. तसेच किडनी देणाऱ्या व्यक्तीलाही प्रत्यारोपणानंतर कोणत्याही प्रकारच्या औषधांची गरज भासत नाही आणि तो निरोगी आयुष्य जगू शकतो.

किडनी ट्रान्सप्लांट हे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा एंड स्टेज रेनल डिसीजच्या उपचारात मदत करते. त्यामुळे रुग्णाला बरे वाटते आणि ते जास्त काळ जगतात.

डायलिसिसच्या तुलनेत, किडनी ट्रान्सप्लांटचे खालील फायदे आहेत:

– चांगलं जीवन जगता येतं.

– मृत्यूचा धोका कमी होतो

– खाण्या-पिण्यावरचे निर्बंध कमी होतात.

– उपचारांचा खर्चही कमी होतो.

किडनी डोनरसाठी ट्रान्सप्लांटचे काय धोके असतात ?

जे लोक किडनी दान करण्याचा विचार करत आहेत, त्यांना याच्याशी संबंधित काही जोखीम आणि फायदे यांची देखील माहिती असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया हा मोठा धोका असला तरी त्यात वैद्यकीय जोखमीपासून ते शरीरावर मोठे डाग पडण्यापर्यंत अनेक समस्या असतात.

– शस्त्रक्रियेनंतर वेदना

– न्युमोनिया किंवा टाके घातलेल्या जागी संसर्गाची भीती

– रक्ताची गुठळी होऊ शकते

– भूल दिसल्यामुळे रिॲक्शन होऊ शकते.

– परत शस्त्रक्रियेची गरज उद्भवू शकते

– हर्निया

– आतड्यांमध्ये अडथळा येऊ शकतो

– किडनीमधून गळती

– डोनेट करण्यात आलेली किडनी (शरीराकडून) नाकारली जाणे

– डोनेट केलेली किडी फेल होणे

– हार्ट ॲटॅक

– मृत्यू

– आयुष्यभराची जोखीम निर्माण होणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनी डोनेट करणाऱ्या लोकांमध्ये किडनीचे कार्य 20-30 टक्क्यांनी कमी होते. कारण दोन्ही मूत्रपिंडांचे काम एकच किडनी करते. याशिवाय, दात्याला खाली नमूद केलेल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो :

– हाय ब्लड प्रेशर

– लठ्ठपणआ

– तीव्र वेदना

– मधुमेह