‘ या ‘ सवयींमुळे होऊ शकते किडनी फेल, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल !

आजकाल खराब लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनी फेल्युअरच्या घटना वाढत आहेत.

' या '  सवयींमुळे होऊ शकते किडनी फेल, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल !
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 12:34 PM

नवी दिल्ली-  किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वपूर्ण भाग आहे. किडनी (kidney) आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. त्यासह ती आपले शरीर डिटॉक्सही (detox) करते. आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नसेल तर शरीरात अनेक आजार (diseases) होऊ शकतात. खराब लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे किडनीच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. जर योग्य वेळी यावर उपचार केले नाहीत तर त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

किडनी फेल होण्याचे कारण व त्यापासून बचावाचे उपाय जाणून घेऊया.

दोन कारणांनी फेल होऊ शकते किडनी 

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, किडनी ही 2 कारणांमुळे फेल होऊ शकते. पहिले आहे ॲक्युट किडनी फेल्युअर तर दुसरे म्हणजे क्रोनिक किडनी फेल्युअर ॲक्युट किडनी फेल्युअर मध्ये किडनीचे कार्य तात्पुरते थांबते. यामध्ये किडनी ट्रान्सप्लान्ट आणि डायलिलिस यांची गरज नसते. मात्र क्रोनिक किडनी फेल्युअर झाल्यास किडनी हळू-हळू खराब होऊ लागते.

काय आहेत किडनी खराब होण्याची लक्षणे ?

जर तुमच्या किडनीचे कार्य सुरळीतपणे नसेल तर शरीरात काही लक्षणे जाणवू शकतात.

– कमी लघवी होणे.

– लघवी करताना रक्त येणे.

– श्वास घेण्यास त्रास होणे.

– खूप जास्त थकवा जाणवणे.

– उलटी होणे.

– छातीत वेदना होणे व दाब आल्यासारखे वाटणे.

– हार्ट ॲटॅक

का फेल होते किडनी ?

अनेक लोक वेदनाशमक, अँटी -बायोटिक्सचा वापर अथवा सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करतात. हेही किडनी फेल होण्याचे कारण बनू शकते. खराब लाइफस्टाइल, मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास या समस्यांमुळेही किडनी फेल होऊ शकते.

कसा करावा बचाव ?

किडनी फेल होण्यापासून बचाव करण्यासाठी वर्षातून कमीत कमी एकदा तरी लघवी आणि रक्ताची तपासणी जरूर करून घ्यावी. स्मोकिंग (धूम्रपान) आणि मद्यपान यांच्यापासून दूर रहावे. हेल्दी आणि पोषक तत्वांनी युक्त असलेल्या आहाराचे सेवन करावे. त्याशिवाय दररोज पूरक प्रमाणात पाणी पित रहावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.