AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga Tips: ‘या’ योग अभ्यासाला विशेषज्ञ मानतात ‘किंग्ज ऑफ ऑल योगाज्‌’ ; तुमच्या संपूर्ण शरीरातील समस्यांमध्ये आहे खुप लाभदायक!

योगअभ्यासांचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. तज्ज्ञांनी काही योगप्रकार मात्र, शरीरासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. या योगअभ्यासाला 'सर्व योगाचे राजे' मानले आहे. संपूर्ण शरीराच्या समस्यांसाठी ते फायदेशीर मानले आहेत. जाणून घेउया, या योगप्रकाराबाबत.

Yoga Tips: ‘या’ योग अभ्यासाला विशेषज्ञ मानतात 'किंग्ज ऑफ ऑल योगाज्‌' ; तुमच्या संपूर्ण शरीरातील समस्यांमध्ये आहे खुप लाभदायक!
शीर्षासनImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2022 | 2:16 PM
Share

योगा अभ्यास संपूर्ण शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यदायी फायदे अनेक अभ्यासामध्ये दिसून आले आहेत. यामुळेच तज्ञ योगासनांसाठी नित्यक्रमात (Routine for Yogasanas) किमान 20 मिनिटे काढण्याचा सल्ला सर्वांनाच देतात. योगाभ्यासामुळे शरीराच्या जवळपास सर्व अवयवांचे काम सुरळीत पद्धतीने चालू राहते, अनेक गंभीर आणि जुनाट आजारांमध्येही योगाभ्यास अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. योग तज्ञ काही आसने शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानतात, हेडस्टँड अर्थात शीर्षासन त्यापैकी एक आहे. शिर्षासनाला योगराज ‘किंग्ज ऑफ ऑल योग’ (Kings of All Yoga) म्हणूनही ओळखले जाते. शीर्षासन सरावाची सवय लावणे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि डोक्यापासून पायापर्यंत एकूण सरावासाठी फायदेशीर ठरू शकते. या सरावाचे फायदे पोटाचे अवयव निरोगी ठेवण्यासाठी आणि खांद्यांना बळकट करण्यासाठी, तणाव आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या (Mental health problems) दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी उपाय आहे. जाणून घेऊया याचा सराव कसा केला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत?

शिर्षासन योग कसा केला जातो?

शिर्षासन योगाचा सराव थोडा कठीण आहे त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शिर्षासन योगाचा सराव तज्ञांच्या देखरेखीखाली करावा. यामध्ये थोडीशी चूकही दुखापत घडवून आणू शकते.

हा योग करण्यासाठी शांत मुद्रेत बसून पुढे वाकून दोन्ही हातांच्या कोपर जमिनीवर टेकवा. आता शरीराचा समतोल राखून डोक्याला आधार देत उलटे उभे राहण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर सुरुवातीच्या स्थितीत परत या. यामध्ये शरीराचा समतोल राखण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते.

असे आहेत शीर्षासनाचे फायदे

  1.  शिर्षासन योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.
  2. तणाव कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी याचे फायदे आहेत.
  3. हे डोळ्यांतील रक्त प्रवाह सुधारते, ज्यामुळे चांगले प्रकाश टिकून राहते.
  4. हात, खांदे आणि कोर यांच्या स्नायूंना ताकद देते.
  5. डोके आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते.
  6. पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी योगसाधना आहे.
  7. पाय, घोट्या आणि गुडघ्यांमध्ये द्रव जमा होणे कमी करते, ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका कमी होतो.
  8. अंतःस्राव ग्रंथींसाठी, प्रामुख्याने पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथींसाठी हा एक अतिशय फायदेशीर व्यायाम आहे.

शीर्षासन करताना घ्यावयाची खबरदारी

मानेला दुखापत झाल्यास किंवा डोकेदुखी झाल्यास हे आसन टाळावे. मासिक पाळी, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, मेंदूला दुखापत, मोतीबिंदू, हर्निया यांसारख्या समस्यांमध्ये हा योग न करण्याचा सल्ला दिला जातो. या योगासनासाठी विशेष एकाग्रता आणि सतर्कतेची आवश्यकता असते, त्यामुळे हा योग एखाद्या तज्ञाच्या देखरेखीखालीच करावा.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.