AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर..

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता वेगळ्या स्तरावर पोहोचला आहे. सतत मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबायला हवे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, युद्ध अधिक पेटत आहे. त्यामध्येच जॉर्डन येथील अमेरिकी लष्कर तळावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर..
Donald Trump
| Updated on: Jul 19, 2026 | 8:04 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला लष्करी संघर्ष आता वेगळ्या पातळीवर गेला. थेट मोठे हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कमी व्हायचे तर ते अधिक वाढताना दिसत आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठे हवाई हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत इराणवर हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडीच्या आसपास जोरदार हल्ले सुरू आहेत. यासोबतच रेल्वे पूल, रेल्वे स्टेशन आणि रस्ते यांना टार्गेट करून अमेरिकेकडून हल्ले केली जात आहेत. अमेरिकेने म्हटले की, कमांडर इन चीफ यांनी दिलेल्या सूचनांनुसार, इराणविरोधात नवीन हवाई हल्ले सुरू केली जातील. याचा मुख्य उद्देश हा आहे की, होर्मुज खाडी सुरक्षित करणे.

इराणची ताकद कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी करायची आहे. यादरम्यानच जॉर्डनमधील अमेरिकी लष्कर तळावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांनी थेट म्हटले की, यापेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार आहे. इराणने केलेल्या जॉर्डनमधील हल्ल्यात दोन अमेरिकेचे सैनिक ठार झाले. ज्यानंतर अमेरिका अधिक भडकल्याचे बघायला मिळतंय.

एक सैनिक अमेरिकेचा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच चार सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे अमेरिका भडकली आहे. इराणी हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांची नावे अमेरिकेच्या लष्कराकडून जाहीर करण्यात आली नाहीत. अगोदर त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगितले जातंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यावर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ही खूप जास्त दुखद घटना आहे. आमच्या देशाची सेवा करताना ते शहीद झाले आहेत. आता अमेरिका अजून मोठे हल्ले इराणवर करणार आहे. इराण देखील अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर देत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये मोठी अशांतता पसरली आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!