AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. पुढील काही तास जगासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अमेरिका इराणवर अत्यंत घातकपणे हल्ले करत आहे. प्रचंड मोठा तणाव आहे. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय.

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा..
Us attacks on Iran
| Updated on: Jul 17, 2026 | 9:51 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या लष्कराने शुक्रवारी इराणच्या दक्षिणी क्षेत्रामध्ये मोठे हल्ले केले. अगोदर फक्त सैन्य ठिकाणांवर हल्ले केले जात होते. आता मोबाईल टॉवर, पुल, विमानतळ, रस्ते, रेल्वे स्टेशन यांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणच्या पायाभूत सुविधांना अमेरिकेडून टार्गेट करण्यात आले. आता अमेरिकेच्या सैन्याचे प्रमुख लक्ष आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला इराणची होर्मुज खाडीतील पकड कमी करायची आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अमेरिकेचा दबाव आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, ड्रोन आणि युद्धनाैकांच्या मदतीने हल्ले केले जात आहेत. एअर डिफेंस सिस्टम, सैन्य लॉजिस्टिक, समुद्रातील सैन्य यांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत.

50 हजारांपेक्षा जास्त सैनिक त्यांचे अलर्ट मोडवर आहेत. अमेरिकेने इराणच्या दक्षिण परिसरात हल्ला केला. केश्म व्दिप, बुशेहर, बोस्तान, दश्ती, बंदर ए लेंगेह आणि सीरिक या भागात धमाक्यांचे आवाज ऐकू आली. मिळालेल्या माहितीनुसार, महत्वाच्या गोष्टींना अमेरिकेकडून टार्गेट केले जात आहे. अब्बास बंदर आणि काही महत्वाच्या शहरांमध्ये धमाके झाले. होर्मोजगानमध्ये रस्ते आणि रेल्वे लाईनला टार्गेट करून हल्ले झाली.

विमानतळावर हल्ले झाली. अमेरिकेने या हल्ल्यात वीज पुरवठाही खंडीत केला. या हल्ल्यानंतर इराणही पेटून उठला. इराणकडून कतार, कुवेत, बहरीनमधील अमेरिकी लष्कर तळावर जोरदार हल्ले करण्यात आले. इराणी सैन्याने इशारा देत सांगितले की, जर अमेरिकेने वीज प्रकल्प आणि इतर नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले सुरूच ठेवले तर संपूर्ण क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल.

ज्यामुळे तणाव हा अधिक वाढला आहे. कारण थेट आखाती देशात इराणला वाट्टेल तिकडे तो हल्ले करेल, ज्यामुळे आखाती देशही संकटात सापडली आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध कमी व्हायचे तर अधिक भडकताना दिसत आहे. अमेरिका पुढील काही तासात अजून इराणवरील हल्ले तीव्र करू शकते. पुढील काही तास जगासाठी अत्यंत धोक्याची असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन