AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाहाकार! सुरक्षा दलाच्या गोळीबारात 40 लोकांचा मृत्यू, तब्बल..

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा हाहाकार उडाला. लष्कराकडून आणि सुरक्षा दलाकडून थेट नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. यादरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. या गोळीबारात तब्बल 40 नागरिक ठार झाल्याची माहिती आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाहाकार! सुरक्षा दलाच्या गोळीबारात 40 लोकांचा मृत्यू, तब्बल..
Pakistan-occupied Kashmir
| Updated on: Jul 30, 2026 | 8:35 AM
Share

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात लोकांचा रोष प्रचंड वाढला. लोक रस्त्यावर उतरत आहेत. यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पाकव्यात काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यानचे काही व्हिडीओ पुढे आलीत. वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. वाढती महागाई, विजेचे वाढलेले भाव याविरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, पाकिस्तानी लष्कराने नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाला तर हजारोच्या घरात नागरिक गंभीर जखमी झालेत.

यानंतर पाकिस्तानी लष्कराने या भागातील इंटरनेट सेवाही बंद केली. लोकांमध्ये सरकाविरोधात मोठा संताप बघायला मिळतो. त्यामध्येच आता थेट गोळीबार करण्यात आल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. लोक सरकारविरोधात उठाव करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. लोकांवर सरकारकडून गोळीबार केला जातोय.

पूर्ण इंटरनेट सेवा ठप्प आहे. वीज पुरवठा खंडीत आहे. मात्र, ज्यावेळी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळीचे हादरवणारे व्हिडीओ पुढे आले. प्रचंड असा अत्याचार लोकांवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये होताना दिसत आहे. लोक अनेक मागण्या करत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे सोडून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहेत. लष्कराकडून सतत गोळीबार पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सध्याची परिस्थिती सरकारसाठीही डोकेदुखी ठरत आहे. लोकांनी मोठा उठाव केला.

त्यामध्येच द न्यूयॉर्क टाइम्सने पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख पाकिस्तानी काश्मीर असा केल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ही शब्दावली दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे. पाकिस्तानी काश्मीर नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाही. तो फक्त पाकव्याप्त काश्मीर आहे. पाकिस्तानी काश्मीर नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर जो छळ होत आहे, तो लपून ठेवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी