AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही, थेट..

पाकिस्तानच्या समस्येत मोठी वाढ झाली. पाकिस्तान आजच्या घडीला चारही बाजूने अडकल्याचे बघायला मिळतंय. पाकिस्तान सरकारची पार वाट लागली आहे. पाकिस्तान सरकार पुढे एक समस्या नाही तर थेट समस्यांचा डोंगर आहे.

पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही, थेट..
Pakistan PoK protest
| Updated on: Jul 16, 2026 | 10:45 AM
Share

सध्याच्या घडीला पाकिस्तान चारही बाजूने अडचणीत सापडला आहे. एकीकडे त्यांच्याकडे असलेल्या पीओकेमध्ये लोकांचा प्रचंड विरोध वाढला हे तर दुसरीकडे बलुचिस्तानच्या बलोच आर्मीने हल्ले अधिक वाढवले आहेत. उत्तर पश्चिम खैबर पख्तूनख्वामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान सतत सुरक्षा जवानांना टार्गेट करत आहे. हेच नाही तर अफगाणिस्तान सीमेवरही प्रचंड तणाव आहे. पाकिस्तान चारही बाजूने घेरला आहे. त्यात संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला दिलेले कर्जही परत मागितली आहे. भारताच्या शेजारी देशात संतापाचा भूकंप लवकरच उठणार हे जवळपास स्पष्ट आहे.पाकिस्तानचे सेनाप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासमोर मोठे संकट उभे आहे. सुरक्षा हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या काश्मीरमध्ये लोकांचा असंतोष वाढत आहे.

पीओकेच्या सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील निर्वासितांसाठीच्या 12 राखीव जागा कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतर अलीकडील वादाला सुरुवात झाली. आता आंदोलन अधिक तीव्र झाले. महाग वीज दर, अन्नधान्याची कमी आणि राजनैतिक अधिकार कमी यावरून लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. यासर्व गोष्टींना नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तान प्रशासनाने जॉइंट अॅक्शन कमिटीच्या नेत्याला अटक केली.

संघटनेवर निर्बंध लादले हेच नाही तर इंटरनेट सेवाही बंद केली. 16 हजार सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले. रिपोर्टनुसार, 20 पेक्षा जास्त लोक यात ठार झाले. लोकांमधील संताप वाढत आहे. काही लोक पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची मागणीही करत आहेत. इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर आणि देशात अशांतता यामुळे पाकिस्तान सरकारला नाकेनऊ आलेत. बलूचिस्तानमधील वेगवेगळ्या भागात जोरदार आंदोलन केले जात आहे.

पाणी हे तेथील मुख्य संकट आहे. सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या उत्तर पश्चिमी भागात अशांतता निर्माण झाली. तहरीक ए तालिबान पाकिस्तान सतत हल्ले करत आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झाला. खैबर पख्तूनख्वाशिवाय अफगाणिस्तान सीमेवरही सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आहे. सतत हल्ले होत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान चारही बाजूने घेरला गेला आहे.

Follow Us
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड