अमेरिकेत हाहाकार! इराण युद्धात मोठा दणका, अमेरिकेच्या लष्करातील तब्बल 42..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हे युद्ध अजूनही संपले नाही. यादरम्यान आता अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. या युद्धादरम्यान झोप उडवणारी माहिती पुढे आली. अमेरिकेला या युद्धात मोठा फटका बसला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या माहितीने एकच मोठी खळबळ उडाली. या युद्धात फक्त इराणचीच वाट लागली नाही तर थेट अमेरिकेलाही मोठा दणका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या एका नुकताच आलेल्या अहवालानुसार, इराणसोबतच्या युद्धात 40 दिवसांमध्ये अमेरिकन सैन्याचे मोठे नुकसान झाले. या 40 दिवसात अमेरिकेच्या लष्करातील तब्बल 42 लष्करी विमाने नष्ट झाली. त्याने अत्यंत मोठे नुकसान झाले. धक्कादायक म्हणजे यात अमेरिकेच्या लष्करातील बेस्ट विमानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या एफ-35 स्टेस्थ फायटरचाही समावेश आहे. लष्करी कारवाईदरम्यान अमेरिकेच्या विमानांना इराणकडून टार्गेट करण्यात आले. थेट मोठे हल्ले केले. इराणच्या हल्ल्यात अनेक अमेरिकी विमान पडले. हेच नाही तर सतत अमेरिकी विमान पडत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा संतापही व्यक्त करण्यात आला होता.
या अहवालादरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त करून विमाने युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये पडली. इराण युद्धात अमेरिकेने लष्करी कारवाई रोखली आहे. युद्धविराम चर्चेवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अजून काही निर्णय होऊ शकला नाही. अमेरिकेने पुन्हा एकदा लष्करी कारवाई करण्याची मोठी धमकी इराणला दिली. मात्र, यात फक्त इराणच नाही तर अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले.
दुसरीकडे इराणवर लष्करी कारवाई करण्याकरिता इस्त्रायल आग्रही आहे. इराणच्या मुलभूत सुविधांचे नुकसान अधिकाअधिक व्हावे, ही इस्त्रायलची मागणी आहे. मात्र, आता अमेरिकेला इराणवर शक्यतो कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई न करता, चर्चेतून मार्ग काढायचा आहे. यावरून अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये मतभेदही झाले. कारण लष्करी कारवाईत थेट अमेरिकेचेही नुकसान होत आहे.
मंगळवारी इराणवर अमेरिका हल्ला करणार असल्याचे सांगितले जात होते. तशी तयारीही करण्यात आली. मात्र, ऐनवेळी अमेरिकेने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. अहवालातून असे दिसून येते की, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षादरम्यान इराणने आपल्या मर्यादित हवाई संरक्षण साधनांचा उत्कृष्ट वापर केला. इराणने अमेरिकेच्या एफ-35 आणि इतर लढाऊ विमानांना खास पद्धतीने टार्गेट केले.