AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणची 48 तासाची डेडलाईन संपली, जगाने श्वास रोखला, कोणत्याही क्षणी..

इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्थिती पोहोचले आहे. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणला अमेरिकेने 48 तासाचा वेळ दिला. मात्र, त्यानंतरही स्थिती तशीच आहे. आता अमेरिका इराणविरोधात नक्की काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

इराणची 48 तासाची डेडलाईन संपली, जगाने श्वास रोखला, कोणत्याही क्षणी..
Iran and America war
| Updated on: Mar 23, 2026 | 12:57 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने नाकीनऊ आलेत. जगावर ऊर्जेचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठ संकटात असून गॅस प्रकल्पांसह तेल रिफायनरीवर घातक हल्ले केले जात आहेत. होर्मुज मार्ग बंद असल्याने जग कोडींत आहे. 48 तासांचा वेळ अमेरिकेकडून इराणला होर्मुज खाडीबाबत देण्यात आला होता. जर इराणकडून 48 तासात होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात आली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले करू असे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेच्या या धमकीला इराणकडूनही त्याच शब्दात उत्तर देण्यात आले असून इराणने म्हटले की, तुम्ही ऊर्जा प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले तर आम्ही आमच्या प्रदेशात असलेल्या अमेरिकेन संबंधित सर्व कंपन्यांवर हल्ला करू. अगोदरच इस्त्रायलने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची चूक केली.

इस्त्रायलने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराणकडून थेट कतारच्या गॅस प्रकल्पावर भयंकर हल्ला करण्यात आला. त्यामध्येच अमेरिकेने जर इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला तर याची एक मोठी चूक जगाला चुकवावी लागेल. इराण आखाती देशावरील ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले करू शकतो.

यादरम्यानच आता अमेरिकेने इराणला दिलेला 48 तासांचा वेळ संपला आहे. होर्मुज मार्ग खुला करण्याबाबत अमेरिकेने इराणला 48 तास दिले होते ते आता संपले आहेत. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, अमेरिका इराणवर मोठा हल्ला करणार का? होर्मुज खाडी इराण माघार घेत नाहीये. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही स्थिती तशीच आहे.

कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर मोठा हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, अमेरिकेच्या निशाण्यावर नक्की काय असेल हे सांगणे कठीण आहे. जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून कोणताही हल्ला केला तर आखाती देश संकटात येऊ शकतात, हे अमेरिकेला चांगल्याप्रकारे माहिती आहे. सध्याच्या परिस्थिती इराणची करो या मरोची लढाई आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?