AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, थेट विमाने रद्द, न्यूयॉर्कच्या…

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे आलीये. अमेरिकेत मोठा विमान अपघात झाला. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटोही पुढे आली आहेत. काही लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, थेट विमाने रद्द, न्यूयॉर्कच्या...
America
| Updated on: Mar 23, 2026 | 11:55 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असतानाच एक अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर एक मोठा अपघात झाला. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. एअर कॅनडा एक्सप्रेसचे विमान विमानतळावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकले. ही धडक अत्यंत भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आल्याची माहिती कळतंय. अपघातानंतर लगेचच जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात अत्यंत भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर विमानतळावर मोठा आवाज झाल्याचेही सांगितले जात आहे.  रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एक सूचना जारी केली.

भीषण अपघातानंतर सर्व उड्डाणे रद्द 

सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. विमानतळाहून कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही. एअर कॅनडा एक्सप्रेसच्या एका विमानाने विमानतळावर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला मोठी धडक दिली. ही धडक दिल्यानंतर काही वेळ विमानतळावर तणावाचे वातावरण बघायला मिळाले. मोठा गोंधळ उडाला. कोणालाही काहीच कळत नव्हते.

जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू

या अपघातानंतर ला गार्डिया विमानतळाकडे जाणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. उड्डाणासोबतच येणाऱ्या विमानांनी रोखण्यात आले. या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट झाले की, अपघात किती भंयकर होता.

विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती पुढे

ऑक्टोबर 2025 मध्ये या विमानाचा मोठा अपघात झाला होता. डेल्टा एअरलाईन्सची दोन विमाने टॅक्सीवेवर एकमेकांवर आदळली, ज्यात एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या कॉकपिटला धडकला. त्यामध्येच आता पुन्हा हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या अपघातामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आले. या अपघातात नेमके किती लोक जखमी झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक