भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत, धक्कादायक अहवाल उघड, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफचा कोणताही परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना स्पष्ट दिसत असून धक्कादायक अहवाल पुढे आलाय.

भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत, धक्कादायक अहवाल उघड, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे...
donald trump indian economy
| Updated on: Sep 30, 2025 | 2:18 PM

अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफचा परिणाम भारतावर इतका जास्त पडला की, भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. भारतासाठी अनेक वर्षांपासून अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिली. कोट्यावधीचा व्यापार भारत अमेरिकेसोबत करत होता. मात्र, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर वस्तू पाठवणे अवघड झाले. होणारे नुकसान टाळण्यासाठी भारताच्या व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची निर्यात थांबव्याचा निर्णय घेतला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा अत्यंत मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आता येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. देशाची आर्थिक वाढ मंदावेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतासाठी ही वाईट बातमी म्हणावी लागेल. आशियाई विकास बँकेने (ADB) मंगळवारी म्हटले की, 2026 च्या पहिल्या तिमाहीत 7.9 टक्के मजबूत वाढ झाली असली तरी, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 6.5 टक्के दराने वाढेल.

अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर दुसऱ्या तिमाहीत तेजीत असलेली अर्थव्यवस्था मंदावू शकते आणि तसे स्पष्ट संकेत देखील आहेत. एडीबीने 2025  (आर्थिक वर्ष 2026) यासोबतच 2026 (आर्थिक वर्ष 2027) साठी भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असा अंदाज आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. भारताला यातून मार्ग काढणे महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच भारतावर अजून काही निर्बंध लादण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याचेही सांगितले जातंय.

2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताची अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने वाढली हे खरे आहे. मात्र, पुढील काही महिने भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खडतर असण्याचे संकेत आहेत. औद्योगिक विकासात सुधारणा झाली आहे, असे आवाहलात म्हणण्यात आले. भारताने सप्टेंबर महिन्यात अधिक रशियाकडून तेल खरेदी केली. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. यासोबतच इतर देशांसोबतही व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, टॅरिफचा फटका भारताला बसताना स्पष्ट दिसत आहे.