डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, अमेरिकेचा हा मित्र भारताच्या बाजूने उभा, थेट व्यापार वाढणार, टॅरिफ..
America Tariff : डोनाल्ड ट्रम्प भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता धमकावताना दिसले. त्यांनी मोठा टॅरिफही लावला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात त्यांचाच मित्र देश उभा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेच्या निर्णयाच्या विरोधात अनेक देश मैदानात उतरले. हेच नाही तर काही देशांनी थेट भारताच्या वस्तूंचे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्वागत करू अशीही भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला वेगवेगळ्या पद्धतीने कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळच्या मित्र देशाने भारताबद्दल मोठे विधान केले. फिनलॅंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना डोनाल्ड ट्रम्प अत्यंत जवळचे मित्र मानतात. आता भारतावर लावलेल्या टॅरिफचे धोरण अमेरिकेने बदलले पाहिजे, असा सल्ला थेट फिनलॅंडकडून देण्यात आला.
फिनलॅंडच्या विदेश मंत्री एलिना वाल्टोनन यांनी म्हटले की, भारतावरील टॅरिफ कमी करण्यासोबतच द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी विचार करत आहोत. यासोबतच अमेरिकेने वारंवार आवाहन करूनही रशियाच्या तेल आणि शस्त्रास्त्र खरेदीवर भारतावर कोणतेही दुय्यम शुल्क लादण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. फिनलॅंडच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले की, आम्हाला भारतासोबत आमचा व्यापार वाढवायचा आहे. याचा अर्थ असा की, जास्त टॅरिफ लावण्यापेक्षा टॅरिफ कमी केला पाहिजे.
नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवरील दबाव वाढवण्यासाठी दोन्ही देशांवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावावा असे युरोपियन युनियनकडे म्हटले आहे. भारत आणि चीन हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच युक्रेन-रशिया युद्ध सुरू असल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. त्यामध्येच भारतावरील टॅरिफ काढण्यासाठी फिनलॅंड आग्रही आहे आणि त्यांच्याकडून दावा केला जातोय की, आम्हाला भारतासोबतचा व्यापार वाढवायचा आहे.
फिनलॅंडने म्हटले की, युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी टॅरिफ महत्वाचा भाग आहे. मात्र, आमचे स्पष्ट मत आहे की, हा टॅरिफ इतर देशांवर लावण्यापेक्षा थेट रशियावरच लावला पाहिजे. भारतावरील टॅरिफ वाढवण्याची काहीही गरज नसल्याचेही सांगितले जाते. आता अमेरिकेचा मित्र देशच त्यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफचा थेट विरोध करताना दिसत आहे. भारताच्या टॅरिफबद्दल अमेरिका निर्णय बदलेल असेही चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे भारतावर अजून निर्बंध लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत.
