होर्मुज खाडीत घडतंय भयंकर, तब्बल 6 देशांची हातमिळवणी, इराणला मोठा दणका, थेट..

अमेरिका आणि इराण युद्ध पेटले आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबवावी, अशी मागणी केली. मात्र, युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. या युद्धात तेलाच्या रिफायनरीवर मोठे हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे जागतिक मार्केटमध्ये तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून मोठा धोका निर्माण झाला.

होर्मुज खाडीत घडतंय भयंकर, तब्बल 6 देशांची हातमिळवणी, इराणला मोठा दणका, थेट..
Strait of Hormuz
| Updated on: Mar 20, 2026 | 7:46 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर केला. त्याच हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते आलातुल्ला खामेनेई ठार झाले. इराण अमेरिका आणि इस्त्रायलच्या पुढे या युद्धात दिसत आहे. अमेरिकेला एका मागून एक मोठे झटके देताना इराण दिसत आहे. इराणच्या तेल सुविधांच्या पायाभूत सुविधांवर मोठा हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला. त्यानंतर यूएई आणि कतारच्या गॅस प्रकल्पांना टार्गेट करत इराणकडून हल्ले करण्यात आले. इराणचे हे हल्ले इतके जास्त घातक होते की, याचे धक्के थेट अमेरिकेपर्यंत पोहोचले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांचा निषेध करत स्पष्ट शब्दात म्हटले की, इस्त्रायल आता इराणच्या ऊर्जा संबंधित कोणत्याही प्रकल्पावर हल्ला करणार नाही. शिवाय इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याबाबत आम्हाला अगोदर माहिती नव्हती. या युद्धात मोठा मास्टर गेम खेळत इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात सर्वकाही थांबले आहे.

होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजाला थेट इराणकडून पेटवले जात आहे. भारताचे काही तेलवाहू जहाज इराणकडून सोडण्यात आली. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही देशांची मदत मागण्यात आली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीकरिता या युद्धात एकही देश पुढे आला नाही आणि होर्मुज खाडीत एकही जहाज पाठवले नाही. तिथेच मोठा धक्का अमेरिकेला बसला.

होर्मुजच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोप आणि जपानने मोठी कारवाई करण्याचे संकेत दिल्याची माहिती मिळत आहे. जर्मनी, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जपान आणि नेदरलँड्स या देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी होर्मुज सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला पाठिंबा दिला.

या देशांनी फक्त जहाजांच्या सुरक्षित प्रवासाकरिता पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या बाजूने 6 देश या युद्धात पुढे आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, हे देश प्रत्यक्षात यात उतरणार नाहीत, ते त्यांनी अगोदरच स्पष्ट केले. होर्मुज खाडीत जहाजांना सुरक्षित पूर्वीसारखा प्रवास व्हावा, हे फक्त त्यांचे म्हणणे आहे. एकही देश अमेरिकेच्या बाजूने या युद्धात मैदानात उतरण्यास तयार नसल्याचे स्पष्ट आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us