America Firing : अमेरिकेत शिकागोत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी

परेड सकाळी 10 वाजता सुरु झाली. मात्र 10 मिनिटांतच गोळीबार झाल्याने परेड थांबवण्यात आली. गेल्या वर्षीही अशीच गोळीबाराची घटना घडली होती. त्यात 19 जण ठार झाले होते.

America Firing : अमेरिकेत शिकागोत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी
अमेरिकेत शिकागोत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गोळीबार
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 04, 2022 | 11:27 PM

शिकागो : अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना गालबोट लागले आहे. शिकागोच्या कार्यक्रमात गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 9 जण ठार (Death) तर 57 जखमी (Injured) झाले आहेत. लेक काऊंटी शेरीफ यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर त्या परिसरातून लोकांना हटवण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे. ज्यात पोलीस आणि इतर यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. दोन हल्लेखोरांनी गोळ्या चालवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परेड सकाळी 10 वाजता सुरु झाली. मात्र 10 मिनिटांतच गोळीबार झाल्याने परेड थांबवण्यात आली. गेल्या वर्षीही अशीच गोळीबाराची घटना घडली होती. त्यात 19 जण ठार झाले होते.

या घटनेची माहिती ट्विटरवर देत प्रशासनाने लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आणि तपास पथकांना त्यांचे काम करू द्या. डब्ल्यूजीएन टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संशयित पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गोळीबारात अनेकांचा मृत्यू

रॉयटर्सच्या अहवालानुसार यूएस प्रतिनिधी ब्रॅड श्नाइडर यांनी सांगितले की, हायलँड पार्कमध्ये गोळीबार सुरू झाला तेव्हा ते आणि त्याच्या जिल्ह्याची मोहीम पथक परेडमध्ये सर्वात पुढे होते. श्नाइडर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अनेकांचा जीव गेला आहे आणि बरेच जण जखमी झाले आहेत. हल्ल्यातील सर्व बळी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे.

परेड सुरु झाल्यानंतर 10 मिनिटांनी गोळीबार

शिकागो सन-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, परेड सुरू झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी गोळीबार करण्यात आला. यानंतर परेड थांबवण्यात आली. जीव वाचवण्यासाठी शेकडो लोक इकडे तिकडे धावू लागले. शिकागोच्या CBS 2 टेलिव्हिजनने परेडमध्ये उपस्थित असलेल्या एका निर्मात्याचा हवाला देत म्हटले आहे की, अनेक मोठे स्फोट ऐकून लोक घटनास्थळावरून पळून गेले. (9 killed, 57 injured in Chicago in america independent program)