AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Umesh kolhe Murder : अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरण, गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सोपवणार

उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर अमरावती शहरात 700 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकट्या राजकमल चौकात 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Amaravati Umesh kolhe Murder : अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरण, गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सोपवणार
अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवणार
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 8:03 PM
Share

अमरावती : अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या (Umesh Kolhe Murder) प्रकरणाचा तपास आता एनआयए (NIA)कडे सोपवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग (Arti Sing) यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले सातही आरोपी एनआयएच्या ताब्यात जाणार असे सिंग म्हणाल्या. या हत्या प्रकरणातील आठवा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. हे प्रकरण अतिसंवेदनशील आहे. इरफानने इतर आरोपींना 10 हजार रुपये आणि एक बाईक दिली. हत्या प्रकरणातील आरोपी युसुफ याच्यावर उमेश कोल्हे यांची उधारी होती. व्हाट्सअप व इतर सोशल मीडिया माध्यमावर आम्ही लक्ष ठेऊन आहे. धमकीचे फोन आल्यास तक्रार करावी. तपास करता येईल. मोहल्ला कमिटी मिटिंग आम्ही घेत आहोत, असेही आरती सिंग यांनी स्पष्ट केले.

एनआयए, एटीएस पथक अमरावतीत दाखल

दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले आहे. ते या प्रकरणाशी संबंधितांची स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. एनआयए पथकाने पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली असून आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हे हत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी झाली होती हत्या

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? हे ही तपासण्यात येत आहे. कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

अमरावतीत पोलीस बंदोबस्त तैनात

उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर अमरावती शहरात 700 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकट्या राजकमल चौकात 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या अमरावतीत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. (Amravati Umesh Kolhe murder case to be handed over to NIA, Commissioner of Police Aarti Singh informed)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.