अमेरिकेत हाहाकार! थेट मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडत असतानाच अमेरिकेत मोठा हल्ला झाला. ज्यात काही लोकांचा जीव गेला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत परिस्थिती चिघळताना दिसत आहे.

अमेरिकेत हाहाकार! थेट मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू..
Donald Trump
| Updated on: May 19, 2026 | 8:37 AM

अमेरिकेत मोठा हल्ला झाला असून थेट खळबळ उडाली. अमेरिकेतील सॅन दिएगो शहरात हल्ला करण्यात आला.  शहरातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक असलेल्या इस्लामिक सेंटर ऑफ सॅन दिएगोच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. हेच नाही तर दोन्ही संशयित हल्लेखोरांचे मृतदेहही आढळली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मशिदीच्या परिसरात उपस्थित लोकांवर हा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांकडून अंदाधूद गोळीबार करण्यात आला. कुठल्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून हा गोळीबार करण्यात आला नाही तर जो पुढे येईल त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर खाली केला. सुरक्षारक्षक तैनात करण्यात आली. सुरक्षारक्षकांकडून या परिसरात उपस्थित असलेल्या लहान मुलांना अगोदर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी मोठ्या प्रमाणात लहान मुलेही तिथे उपस्थित होती. भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेबद्दल बोलताना म्हटले की, अत्यंत भीषण परिस्थिती आहे. आम्ही या प्रकरणात चाैकशी करू. त्यांनी यादरम्यान मध्य पूर्व आणि इराणचाही उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, काहीही झाले तरीही आम्ही इराणला अण्वस्त्रे मिळू देणार नाहीत, कोणत्याही परिस्थितीत नाहीच.

घडलेली घटना गंभीर आहे. तज्ज्ञांकडूनही मशिद परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटले आहे. स्थिती गंभीर होत आहे. कोणत्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, ही जगाची मागणी आहे. मात्र, दोन्ही देश आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे बघायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us