AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीचा भडका, तब्बल 278 प्रवासी..

धक्कादायक घटना पुढे येत आहे. 278 प्रवासी असलेल्या तुर्कीश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. काही महत्वाचे अधिकारी देखील या विमानात होते.

विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीचा भडका, तब्बल 278 प्रवासी..
Turkish Airlines
| Updated on: May 11, 2026 | 9:24 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली. त्यामध्येच आता एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. या घटनेने जगात हाहाकार उडाला. नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना तुर्किये एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. ही आग लागताच एकच खळबळ उडाली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी विमानात तब्बल 278 प्रवासी आणि 11 विमान कर्मचारी होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला. नियंत्रण कक्षाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळत सर्व प्रवाशांना सुखरूप सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या विमानाला आग लागताच एकच खळबळ उडाली. मात्र, आग नक्की कशी लागली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. या आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. आग काही वेळातच सर्वत्र पसरली.

विमानतळ सुरक्षा अधीक्षक राजकुमार सिलवाल यांनी एएनआयला फोनवरून बोलताना अपघाताबद्दल माहिती दिली. राजकुमार सिलवाल यांनी सांगितले की,  तुर्कीश एअरलाइन्सचे विमान TK 726 इस्तंबूलहून काठमांडूला निघाले असता लँडिंग करताना त्याच्या टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग वाढण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांसह 278 प्रवासी होते. यासोबतच 11 कर्मचारीही होते. सर्वजण सुखरूप आहेत. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. मात्र, कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

या आगीच्या घटनेने विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, ही आग नक्की कशी लागली याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीये. विमानात तब्बल 278 प्रवासी होते. जर आग भडकली असती आण वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. आगी नक्की कशी लागली याचा तपास केला जात आहे. नक्की कुठे चूक झाली, याचा तपास हा केला जात आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल