पहिल्यांदाच खोदकाम करण्यास निघाली तरुणी, ९० मिनिटांत १२०० वर्षे पुरातन सोने सापडले

ब्रिटनमध्ये पुरातत्व संशोधनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनीला तिच्या पहिल्याच खोदकामात केवळ दीड तासातच एक अनोखी वस्तू सापडली. एक सोन्याचा तुकडा तिला मिळाला आहे. नंतर तपासाअंती कळेल की हे सोने तब्बल १२०० वर्षे पुरातन आहे.

पहिल्यांदाच खोदकाम करण्यास निघाली तरुणी, ९० मिनिटांत १२०० वर्षे पुरातन सोने सापडले
Gold Treasure Found
| Updated on: Aug 20, 2025 | 5:35 PM

ब्रिटनमध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात अमेरिकेतून आलेल्या एका विद्यार्थीनीने अशा कमाल केली की लोक हैराण झाले आहेत. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीत शिकणारी यारा सुझा हीने तिच्या जीवनातील पहिले खोदकाम केले आणि अवघ्या ९० मिनिटांत आत तिला नवव्या शतकातील एक रहस्यमयी सोन्याचा आर्टीफॅक्ट खजाना मिळाला आहे. यारा हिचा आनंद त्यामुळे गगनात मावेनासा झाला आहे. ती आनंद व्यक्त करताना म्हणाली की मला विश्वासच वाटत नाही की इतक्या लवकर एवढा मोठा शोध माझ्याकडून लागेल.

Gold Treasure Found

ही सोन्याची बनलेली वस्तू केवळ ४ सेंटीमीटर लांब आहे. आकाराने छोट्या नॉब सारखी दिसते. विशेष म्हणजे याच जागी साल २०२१ मध्ये एका धातू शोधकाला हुबेहुब अशीच परंतू थोडी छोटी वस्तू मिळाली होती. दोन्हीही वस्तू मिळून हे कोणतेही सामान्य पिन किंवा दागिना नसून धार्मिक वा औपाचारिक कामात वापरली जाणारी वस्तू वाटत आहे. हा दुर्लभ शोझ ब्रिटनच्या नॉर्थम्बरलँड (Northumberland) येथे लागला आहे.ठीक तेथे जेथे कधी काही प्राचीन रोमन रोड-डेरे स्ट्रीट (Dere Street) असायची.

तज्ज्ञांचे मत काय ?

इतिहासकारांच्या मते, रोमन साम्राज्याच्या वेळी हा मार्ग महत्वाचा होता. येथून स्कॉटलंडपर्यंत गरजेच्या वस्तू पुरवल्या जात असायच्या. या खोदकामाचे नेतृत्व करत असलेले न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेम्स गेरार्ड यांनी सांगितले की या दोन्ही सोन्याच्या वस्तू जाणूनबुजून येथे पुरल्या असाव्यात.कारण सोने नेहमीच उच्च दर्जा आणि शक्तीचे प्रतिक राहीले आहे. त्यामुळे याता थेट संबंध धार्मिक अनुष्ठानांशी असू शकतो.

आता या दोन्ही आर्टिफॅक्ट्सचा पुढे वैज्ञानिक तपास केला जाणार आहे. तसेच ब्रिटनच्या पोर्टेबल एंटिक्विटीज स्कीम (Portable Antiquities Scheme)अंतर्गत यांना अधिकृतपणे दर्जा मिळणार आहे. ब्रिटनचे पुरातत्व विशेषतज्ज्ञ एंड्रयू एगेट यांनी सांगितले की हे एक शानदार उदाहरण आहे की आर्कियोलॉजिस्ट आणि मेटल डिटेक्टरिस्ट यांनी मिळून इतिहासातील नवीन रहस्य शोधणे सुरु केले आहे.

पोलँडच्या कालिस्ज शहराच्या जवळ असलेल्या ग्रोडजिएक जंगलात या उन्हाळ्यात एक अशा किस्सा झाला त्याने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.काही जण मजा म्हणून गुप्त खजाना शोधत होते. त्यांची नशीब चांगले होते की त्यांना खरोखरच शतकाहून जुना खजाना हाती लागला. डेनार कालिस्ज नावाचा हा गट जुन्या वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. केवळ पाच आठवड्याच्या मेहनतीत त्यांनी इतिहासातील अनेक ऐवज शोधून काढला. सर्वात अनमोल होता – पाचव्या शतकातील खूपच सुंदर आणि मौल्यवान सोन्याचा हार सापडला आहे.हा प्रवास जुनमध्ये सुरु झाला होता. त्यात आधी रोमन काळातील एक स्मशान सापडले. तेथे एका योद्ध्याचे अवशेष सापडले. त्याच्याजवल भाला आणि ढालीचा तुटलेला एक तुकडा सापडला.