अशी वेळ कोणत्याही देशावर येऊ नये, सर्वाेच्च नेत्याला श्रद्धांजली वाहताना रडले अख्खे मंत्रिमंडळ, थेट संसदेचे अध्यक्षही..

इराण आणि अमेरिका युद्धात जगाची झोप उडाली होती. अमेरिकेने इराणवर पहिला हल्ला करून युद्ध भडकवले. त्यानंतर इराणही त्यांना जोरदार उत्तर देताना दिसला. मात्र, अमेरिकेच्या पहिल्याच हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. यादरम्यानच आता इराणमधून एक भावनिक व्हिडीओ पुढे येताना दिसतोय.

अशी वेळ कोणत्याही देशावर येऊ नये, सर्वाेच्च नेत्याला श्रद्धांजली वाहताना रडले अख्खे मंत्रिमंडळ, थेट संसदेचे अध्यक्षही..
Ayatollah Ali Khamenei
| Updated on: Jul 04, 2026 | 9:47 AM

इराणचे सर्वाेच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्यावर अखेर अंतिम संस्कार करण्यात आले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात आयतुल्लाह अली खामेनेई ठार झाले होते. त्यांच्या कुटुंबातील जवळपास सदस्यही या हल्ल्यात ठार झाले. इराणचे सध्याचे सर्वाेच्च नेते आणि आयतुल्लाह खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई या हल्ल्यात जिवंत राहिला. मोजतबा खामेनेई देखील जखमी आहेत. अख्ख्ये कुटुंब हल्ल्यात मारल्या झाल्यानंतरही मोजतबा खामेनेई यांनी इराणची सूत्रे आपल्या हातात घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही ते देशासाठी लढताना दिसले. इराण आणि अमेरिका युद्ध तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू होते. मात्र, शेवटपर्यंत इराणने या युद्धात अजिबात हार मानली नाही. अमेरिकेसोबतचे युद्ध थांबल्यानंतर आयतुल्लाह अली खामेनेई यांच्यावर अंतिम संस्कार झाले. यावेळी इराणमधील सर्वप्रमुख नेते उपस्थित होते.

सर्व मंत्रिमंडळ आयतुल्लाह अली खामेनेई यांच्याकरिता रडताना दिसले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. हुंदके देऊन रडताना परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि इराणी संसदेचे प्रमुख मोहम्मद बागेर गलिबाफ दिसले. यादरम्यानचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या अखेरच्या निरोपाचा कार्यक्रम 3 ते 9 जूनपर्यंत चालणार आहे.

आयतुल्लाह अली खामेनेई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भारताच्या प्रतिनिधिमंडळातून बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि विदेश राज्य मंत्री मार्के रिटा पोहोचले आहेत. इराण सरकारने भारतातील 5 लोकांना याकरिता विशेष आमंत्रण दिले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने इराणवर केलेल्या पहिल्याच हल्ल्यात आयतुल्लाह अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य ठार झाले.

सर्वाेच्च नेत्याला ठार केल्यानंतर हे युद्ध फार काळ चालणार नाही, असा अंदाज अमेरिकेचा होता. मात्र, सर्वकाही उलटे झाले. अमेरिकेला इराणने शेवटपर्यंत सळो की पळो करून सोडले. यादरम्यानच इराणच्या शक्तिशाली सुरक्षा बल आयआरजीसीचे प्रमुख अहमद वाहिदी यांनी यादरम्यान स्पष्ट केले की, आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल.

Follow Us