
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, एक व्यक्ती चक्क तीन वर्ष आपल्या मृत्यू झालेल्या आईचा वेष परिधान करून सर्वत्र वावरला, मात्र जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा, सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान या व्यक्तीला आता अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी केली असता त्यानं असं का केलं याबाबत एक विचित्र कारण समोर आलं आहे, हे कारण ऐकून पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीच्या आईचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह घरातच पुरला, आणि त्यानंतर तो स्वत: आपल्या आईचा वेष परिधान करून सर्वत्र फिरू लागला.
एवढंच नाही तर या व्यक्तीनं आईचा मृत्यू झालेला असताना सुद्धा आईचे सर्व कागदपत्रं देखील अपडेट करून घेतले. या काळात प्रशासकीय यंत्रणेला या व्यक्तीवर थोडा देखील संशय आला नाही. मात्र या व्यक्तीचं बिंग फुटल्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरात पुरला, त्यानंतर त्याने त्याची आई जशी दिसत होती, तसेच कपडे, आणि गेटअप केला. एवढंच नाही तर त्याची आई कशी चालायची कशी बोलायची याचा देखील प्रचंड सरावं केला. तीन वर्ष या व्यक्तीवर लोकांना काहीही संशय आलं नाही, मात्र एका सरकारी कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आलं. पोलीस चौकशीमध्ये या व्यक्तीनं धक्कादायक खुलासा केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना इटलीमधील आहे, इटलीचा रहिवासी असलेल्या एका 56 वर्षीय व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला, हा व्यक्ती बेरोजगार होता, त्याच्या आईला पेन्शन सुरू होती, मात्र आईचा मृत्यू झाला नंतर तिची पेन्शन बंद होईल या भीतीनं या व्यक्तीने तिचा मृत्यू झाला आहे, याची माहिती कोणालाही दिली नाही, त्याने आपल्या घरातच आईचा मृतदेह पुरला आणि आईची वेषभूषा करून या व्यक्तीने तब्बल तीन वर्ष आईला मिळणाऱ्या पेन्शचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्या महिलेचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, तीच महिला तीन वर्ष सर्वत्र वावरताना दिसली, पेन्शनचा लाभ देखील घेतला, कागदपत्र देखील अपडेट केले, मात्र जेव्हा या महिलेचा मृतेदह पोलिसांनी ताब्यात घेतला तेव्हा आता खळबळ उडाली आहे, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलं आहे.