आम्ही देश सोडून पळाल्याच्या अफवा अत्यंत क्लेशकारक: पुनावाला

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा वेग अत्यंत संथ आहे. | Cyrus poonawalla covishield

आम्ही देश सोडून पळाल्याच्या अफवा अत्यंत क्लेशकारक: पुनावाला
सायरस पुनावाला
| Updated on: May 17, 2021 | 8:54 AM

लंडन: मी आणि माझा मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाहीत. आम्ही केवळ सुट्टीसाठी लंडनमध्ये आलो आहोत, असे वक्तव्य सायरस पुनावाला ( Cyrus poonawalla)  यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून अदर पुनावाला (Adar poonawalla) यांचे कुटुंब देश सोडून पळाल्याची चर्चा आहे. मात्र, आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या असल्याचे सायरस पुनावाला यांनी म्हटले. (Adar poonawalla father Cyrus joins family in London)

प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे सायरस पुनवाला यांनी स्पष्ट केले. कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमुळे पुनावाला कुटुंबीय गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहेत. अदर पुनावाला हे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सध्याच्या घडीला देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अदर पुनावाला यांचे प्रत्येक वक्तव्य आणि कृतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. अशातच काही दिवसांपूर्वी अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याने उलटसुलच चर्चा सुरु आहेत.

‘सिरम’कडून भारताला 90 टक्के लसींचा पुरवठा

आतापर्यंत भारतात देण्यात आलेल्या एकूण लसींपैकी 90 टक्के लसी या सिरम इन्स्टिट्यूटकडून पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. आपल्याला भारतातील काही राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींकडून कोरोना लसीसाठी धमक्या मिळाल्याचे त्यांनी लंडनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा वेग अत्यंत संथ आहे. यासाठी केंद्र सरकारेच अयोग्य लसधोरण आणि सिरम इन्स्टिट्यूटला उत्पादन वाढवण्यात आलेले अपयश ही दोन प्रमुख कारणे मानली जात आहेत. मात्र, अदर पुनावाला यांनी एका रात्रीत लसींचे उत्पादन वाढवणे शक्य नसल्याचे सांगितले होते. आम्ही कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र, भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत लसीचा तुटवडा जाणवेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या: 

कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले, मात्र ज्यांनी दोन्हीही डोस घेतलेल्यांचे काय? जाणून घ्या एक्स्पर्ट काय म्हणाले?

जनता आणि सरकार बेफिकीर राहिल्यानेच दुसरी लाट; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल: मोहन भागवत

Corona vaccine : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा

(Adar poonawalla father Cyrus joins family in London)