AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले, मात्र ज्यांनी दोन्हीही डोस घेतलेल्यांचे काय? जाणून घ्या एक्स्पर्ट काय म्हणाले?

ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले आहे. (Increased the gap between Covishield's second vaccine, Know what the expert said)

कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले, मात्र ज्यांनी दोन्हीही डोस घेतलेल्यांचे काय? जाणून घ्या एक्स्पर्ट काय म्हणाले?
कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले
| Updated on: May 15, 2021 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. आता दोन्ही डोस दरम्यान 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्यात येईल. दोन डोसमधील अंतर वाढल्यामुळे ही लस अधिक प्रभावी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर ज्यांनी दोन आधीच घेतले आहेत त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले आहे. (Increased the gap between Covishield’s second vaccine, Know what the expert said)

काय म्हणाले डॉ.अरोरा?

देशभर लसीची कमतरता दिसून येत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत कोवाक्सिन नसल्यामुळे 100 हून अधिक केंद्रे बंद झाली आहेत. अशा परिस्थितीत कोविशिल्डच्या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून सामान्य लोकही चकित झाले आहेत. यावर कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी ‘इंडिया टुडे’ शी बोलताना सांगितले की ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ते म्हणाले, सरकार 24 तास लसी घेत असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये एस्ट्राजेनेका लस दिली जात आहे आणि नवीन डेटा आणि माहितीच्या आधारे आम्ही निर्णय घेत आहोत. गेल्या आठवड्यात आम्हाला युकेकडून नवीन डेटा मिळाला आहे, ज्याच्या आधारे नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आहेत. त्यामुळे आता या दोन्ही डोसमध्ये 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण अंतर वाढल्यामुळे लसीचा परिणामही वाढत आहे.

पुढील आठवड्यात स्पुतनिक-V चे 1.5 कोटी डोस उपलब्ध

स्पुतनिक-V रशियन लसबद्दल बोलताना ते म्हणाले की, पुढच्या आठवड्यात आमच्याकडे रशियन लसचे 15 दशलक्ष डोस असतील. ते म्हणाले, सध्या केवळ खासगी रुग्णालयात स्पुतनिक-V देण्यात येईल, कारण एकदा या लसचे सील काढल्यानंतर ती दोन तासाच्या आत वापरावी लागेल. सद्य परिस्थितीत केवळ खासगी रुग्णालयांमध्ये या लसीसाठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे सध्या ती खासगी रुग्णालयात दिली जाईल. लसीकरण केंद्रातही ती पुरविली जाईल.

पुढील तीन महिन्यांत अधिक लस येईल

लस टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्याशी चर्चा करीत आहे. ते म्हणाले, चर्चा सुरू आहेत, परंतु जगात लस उत्पादकही अधिक नाहीत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. तसे झाले असते तर आम्ही ऑर्डर देऊ शकलो असतो. लस खरेदी करण्यास वेळ लागतो. तसेच सरकार जागतिक उत्पादकांसोबत स्वदेशी कंपन्यांशीही चर्चा करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणतात की, फायझर आणि मॉडर्ना लस लागू होण्यापूर्वी स्वदेशी लस येऊ शकते. सप्टेंबरपर्यंत फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींना मान्यता दिली जाऊ शकते, असेही डॉ. अरोरांनी स्पष्ट केले.

दुसरी लाट खूप भयानक

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर चर्चा करताना डॉ. अरोरा म्हणाले की, लोकांना माहित होतं की दुसरी लाट येईल, पण इतका हाहाःकार माजेल याची कल्पनाही कोणाला करता आली नव्हती. दुसर्‍या लाटेच्या भयानकतेमागे नवीन व्हेरिएंट (B.1.617) आहे. हा एक आरएनए व्हायरस आहे, ज्याचा अर्थ असा आहे की तो सतत म्युटेट होत राहील. सरकारने आता कोरोनाशी 24 तास, 365 दिवस सामोरे जाण्याच्या तयारीत असावे. काटेकोरपणे लक्ष ठेवणे हा एकमेव मार्ग आहे आणि जर नवीन स्ट्रेन कुठेही आढळल्यास त्यावर तेथेट नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असेही डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले.

यावर्षी मुलांसाठी लस येईल

भारत बायोटेकला लहान मुलांच्या लसीवर चाचणी घेण्यास मान्यता मिळाली आहे. या चाचणीचा निकाल सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे आणि वर्षाच्या अखेरीस मुलांचे लसीकरण देखील सुरू होऊ शकते, असे अरोरा यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की तिसरी लाट मुलांसाठी अधिक धोकादायक असेल, परंतु मला तसे वाटत नाही. तथापि, त्यासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. हा विषाणू खूप संक्रामक आहे आणि आपण पाहत आहोत की बरेच यंगस्टर्स यात संक्रमित होत आहे. म्हणूनच लोकांचे म्हणणे आहे की तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर होईल. (Increased the gap between Covishield’s second vaccine, Know what the expert said)

इतर बातम्या

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे : नाना पटोले

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.