War News: नव्या युद्धाला सुरुवात? ‘हा’ देश अमेरिका व पाकिस्तानशी भिडण्यास तयार, ट्रम्प यांची झोप उडाली

गेल्या काही दिवसांपासून जगात तणावाची परिस्थिती आहे. अशातच आता अमेरिकेची नजर अफगाणिस्तानचा बग्राम एअरबेसवर आहे. अमेरिकेला हा एअरबेस पुन्हा आपल्या ताब्यात हवा आहे. मात्र यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

War News: नव्या युद्धाला सुरुवात? हा देश अमेरिका व पाकिस्तानशी भिडण्यास तयार, ट्रम्प यांची झोप उडाली
Trump vs Taliban
| Updated on: Sep 23, 2025 | 7:47 PM

गेल्या काही दिवसांपासून जगात तणावाची परिस्थिती आहे. अशातच आता अमेरिकेची नजर अफगाणिस्तानचा बग्राम एअरबेसवर आहे. अमेरिकेला हा एअरबेस पुन्हा आपल्या ताब्यात हवा आहे. ‘अमेरिकेने हा एअरबेस बांधला आहे आणि जर तालिबानने तो परत केला नाही तर त्याचे परिणाम भयानक होतील’ असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याला उत्तर देताना तालिबानने, ‘आम्ही एक मीटरही जमीन देणार नाही, अमेरिकेने बग्राम एअरबेस पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दुसऱ्या युद्धासाठी तयार राहावे’ असं म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली तर त्यांनाही परिणाम भोगावे लागतील असं तालिबानने म्हटले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंधारमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तालिबानने अमेरिकेला बग्राम एअरबेस पुन्हा ताब्यात न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालिबान युद्धाच्या मैदानात उतरण्यास तयार आहे. या बैठकीला तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांच्यासह कॅबिनेटचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर प्रमुख, लष्करी कमांडर आणि उलेमा कौन्सिल हे उपस्थित होते. जर हल्ला झाला तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत अशी भूमिका तालिबानने स्पष्ट केली आहे.

तालिबानचा पाकिस्तानलाही इशारा

पाकिस्तान आणि अमेरिकेत जवळीक आहे. याचा फटका तालिबानला बसू शकतो. त्यामुळे आता तालिबानने पाकिस्तानलाही इशारा दिला. जर पाकिस्तानने अमेरिकेला लष्करी किंवा राजनैतिक मदत किंवा पाठिंबा दिला तर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तालिबानने रशिया, चीन, इराण, पाकिस्तान, कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि भारतालाही या मुद्द्यावर भूमिका काय आहे याची विचारणा केली आहे.

ट्रम्पच्या धमकीला तालिबानचे प्रत्युत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानने बग्राम एअरबेस अमेरिकेला परत केला नाही तर ते खूप वाईट परिणाम होईल असं विधान केलं आहे. याला उत्तर देताना तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी, आम्ही अमेरिकेला एकही मीटर जमीन देणार नाही. तसेच तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी झाकीर जलाली यांनी म्हटले होते की, “इतिहासात अफगाण लोकांनी कधीही परदेशी सैन्याची उपस्थिती स्वीकारली नाही”. याचाच अर्थ तालिबान बग्राम एअरबेस अमेरिकेला देणार नाही. तसेच अमेरिकेने तसा प्रयत्न केल्या तो हाणून पाडला जाणार आहे.