अफगाणिस्तानने ओलीस ठेवलेल्या 7 पाकिस्तानी सैनिकांचा धक्कादायक फोटो केला शेअर, अफगाणचा मोठा दावा, 12 नव्हे…

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील तणाव वाढला असून स्थिती युद्धीची निर्माण झालीये. अफगाणिस्तानने हल्ल्यानंतर काही पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवले आहे. आता त्याचाच फोटो थेट अफगाणिस्तानने शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.

अफगाणिस्तानने ओलीस ठेवलेल्या 7 पाकिस्तानी सैनिकांचा धक्कादायक फोटो केला शेअर, अफगाणचा मोठा दावा, 12 नव्हे...
Afghanistan attack Pakistan
| Updated on: Oct 12, 2025 | 1:35 PM

अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला. एक दोन नाही तर तब्बल 7 लष्कर चाैक्या अफगाणिस्तानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या होत्या. जवळपास 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार अफगाणिस्तानने केल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. 7 पैकी 3 चाैक्या अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या आपल्या ताब्यात घेतल्या. आता नुकताच अफगाणिस्तानच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या 7 सैनिकांना त्यांनी ओलीस ठेवलंय यासोबतच त्यांनी पाकिस्तानच्या ओलीस ठेवलेल्या सैनिकांचा थेट फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अफगाणिस्तानने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका ठिकाणी डोळ्यांना कपडे बांधून पाकिस्तानी सैनिकांना ठेवण्यात आलंय. यासोबत त्यांची हात देखील बांधण्यात आलीत. अफगाण सैन्याने तीन तास पाकिस्तानवर मोठी कारवाई केली.

अफगाणिस्तानने डुरंड सीमारेषेजवळील अनेक पाकिस्तानी सीमा चौक्यांवर गोळीबार केला. या चकमकीत पंधरा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा त्यांचा दावा आहे. या संघर्षादरम्यान सात जणांनी आत्मसमर्पण केले आणि अफगाणिस्तानने तीन पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा अफगाणिस्तानने केला. हेलमंड प्रांतीय सरकारचे प्रवक्ते मौलवी मोहम्मद कासिम रियाझ यांनी पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती दिली.

शनिवारी रात्री डुरंड सीमारेषेजवळील बहरामपूर जिल्ह्यात अफगाण सैन्याच्या प्रतिहल्ल्यात 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. गुरूवारी पाकिस्तानने काबुल येथे क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ला उत्तर म्हणून आम्ही पाकिस्तानवर हा हल्ला केल्याचे अफगाणिस्तानने म्हटले. अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितले की आमची कारवाई मध्यरात्री संपली. जर पाकिस्तानने पुन्हा सीमेचे उल्लंघन केले तर त्यांचे सैन्य देशाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तान विरोधात अफगाणिस्तान चांगलीच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या सैन्यावर इतका मोठा हल्ला अफगाणिस्तानने केला असून या हल्ल्याबद्दल पाकिस्तानने काहीच भाष्य केले नाहीये. पाकिस्ताने माैन बाळगले आहे. सध्या अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याचे बघायला मिळतंय. अफगाणिस्तानने अगोदरच स्पष्ट केले की, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहोत. आता पाकिस्तान आपल्या सात सैनिकांना सोडण्यासाठी काय भूमिका घेतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, स्थिती युद्धाची निर्मण झाल्याचे सांगितले जात आहे.