पाकिस्तानवरील भयानक हल्ल्यावर मुस्लिम देशांची मोठी प्रतिक्रिया, कतार, सौदी अरेबिया यांनी थेट…
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळतोय. काल रात्री मोठा हल्ला अफगाणिस्तानने केला. ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार आहे. स्थिती अजून चिघळण्याची शक्यता असताना मुस्लिम देशांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण बघायला मिळाले. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या सैन्य चाैक्यांना टार्गेट करत हल्ला चढवला. या हल्ल्याची काही फोटो आणि व्हिडीओ देखील पुढे आली. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला अफगाणिस्तानने जोरदार उत्तर दिले. हेच नाही तर पाकिस्तानचे 12 सैनिक या हल्ल्याच ठार झाली. काहींना बंदी बनवण्यात आलंय. अफगाण तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या भीषण चकमकीनंतर या प्रदेशात युद्धाचा धोका निर्माण झालीये. अफगाणिस्तानने हा मोठा हल्ला करत पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. फक्त हल्लाच नाही तर त्यांनी थेट मोठा इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानच्या काही चाैक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा देखील अफगाणिस्तानने केला.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केल्याचे स्पष्ट केले. हेच नाही तर तालिबानने हा एक यशस्वी हल्ला असल्याचे म्हटले. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षानंतर मुस्लिम देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. या तणावाच्या परिस्थितीमध्ये भारताने यावर भाष्य करणे टाळले आहे. मात्र, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन भारत नक्कीच आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीमध्ये चिंता व्यक्त करत सौदी अरेबियाने म्हटले की, सौदी अरेबिया आत्मसंयम बाळगण्याचे, तणाव वाढवणे टाळण्याचे आणि संवाद आणि समजूतदारपणा स्वीकारण्याचे आवाहन करत आहे. तणाव कमी व्हायला हवा असे सौदी अरेबियाने म्हटले. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे, त्यानंतर हा मोठा हल्ला पाकिस्तानवर झालाय.
कतारनेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागातील तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही बाजूंना संवाद आणि संयमाला प्राधान्य देण्याचे आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेसाठी तणाव कमी करण्याचे आणि आवाहन केले. यासोबतच अजून काही मुस्लिम देशांनी यावर भाष्य केले असून परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे म्हटले. भारताने या परिस्थितीवर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाहीये. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्याचे काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहेत.
