Video : पाकिस्तानच्या लष्कर चाैक्या अफगाणिस्तानच्या ताब्यात, काळजाचा ठोका चुकवणारा हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, 12 सैनिक ठार, 5 जणांनी थेट…
अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला पाकिस्तनने केला. त्यानंतर अफगाणिस्तानने मोठा बदला घेत थेट पाकिस्तानच्या चाैक्यांना टार्गेट बनवत मोठा हल्ला केला. आता या हल्ल्याचा धक्कादायक असा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान -अफगाणिस्तान सीमेवर तणाव बघायला मिळाला. आता हा तणाव इतका जास्त वाढला की, अफगाणिस्तानने थेट पाकिस्तान सैन्याच्या चाैक्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका जास्त भयंकर होता की, थेट पकिस्तानचे 17 सैनिक मारले केले. यासोबतच 5 सैनिकांना ताब्यात घेण्यात आले. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यादरम्यानचा एक धक्कादायक असा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तान सैन्य पाकिस्तानच्या चाैक्यांना टार्गेट बनून हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेतल्याचे अफगाणिस्तानने म्हटले. यासोबतच परत हल्ला करण्याचा विचारही करू नका, असे अफगाणिस्तानने म्हटले.
अफगाणिस्तानने इतका मोठा हल्ला केल्यानंतरही यावर पाकिस्तान सरकारने अजूनही काही भाष्य केले नाहीये. जवळपास अर्धा तास फायरिंग सुरू होती. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या तब्बल 7 लष्कर चाैक्यांना टार्गेट केले. स्थानिकांनी या हल्ल्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 201 खालिद बिन वलीद आर्मी कॉर्प्सने नांगरहार आणि कुनार प्रांतातील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला.
या हल्ल्याचा धक्का म्हणजे पाकिस्तानच्या काही चाैक्यांवर अफगाणिस्तानने ताबा मिळवला आहे. कंधारच्या मेवंद जिल्ह्यात पाच पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केले. जे आता अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत. सीमा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तातने अजूनही यावर भाष्य केले नसून पाकिस्तानी सैन्याचे किती जवान या हल्ल्यात ठार झाले याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
منابع: پنج نظامی پاکستانی در آن سوی خط فرضی کشته شدند
منابع به طلوعنیوز تایید کردند که در نتیجه درگيری میان نیروهای امارت اسلامی افعانستان و پاکستان، تاکنون پنج نظامی پاکستانی کشته و دو نفر دیگر زخمی شدهاند.#طلوعنیوز pic.twitter.com/fujJ3Lmxi1
— TOLOnews (@TOLOnews) October 11, 2025
9 ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि इतर शहरांमध्ये शांतता होती, तेव्हा पाकिस्तानी लढाऊ विमाने अचानक आकाशातून गेली. काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिकाला त्यांनी टार्गेट केले. यानंतर आता अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानच्या चाैक्यांना टार्गेट करत हा मोठा हल्ला चढवला. यामुळे मोठी एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. विरोधी बाजूने पुन्हा अफगाणिस्तानच्या प्रादेशिक सीमेचे उल्लंघन केले तर आम्ही उत्तर देऊ असेही त्यांनी म्हटले. अफगाणिस्तान-पाकिस्तान वादात भारताने माैन बाळगले आहे.
