पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचे भारताबद्दल थेट मोठे विधान, थेट..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध कायमच चांगली राहिली आहेत. त्यामध्येच आता अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांने पाकिस्तानला मिरच्या लागतील असे विधान थेट भारताबद्दल केले. ज्याने एकच चर्चा सुरू झाल्याचे बघायला मिळतंय.

पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचे भारताबद्दल थेट मोठे विधान, थेट..
Afghanistan Minister Maulvi Ataullah Omari
| Updated on: Jul 11, 2026 | 1:54 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कायमच चांगले संबंध राहिले आहेत. ज्या ज्यावेळी अफगाणिस्तानला भारताची मदत लागली, त्यावेळी भारताने अफगाणिस्तानची साथ दिली. यामध्येच हे संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. अफगानिस्तानचे कृषी आणि पशुपालन मंत्री मौलवी अताउल्लाह ओमरी यांनी नुकताच भारत आणि अफगाणिस्तान यांच्या नात्यावर थेट भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भारत आणि अफगाणिस्तानचा डीएनए एकच आहे. भारतात येऊन असे वाटते की, मी माझ्या लोकांमध्येच आहे. नवी दिल्लीच्या विदेश मंत्रालयाने आयोजित केलेल्या इंडिया अफगाणिस्तान ट्रेड अपॉर्च्युनिटीज इंडस्ट्री इंटरॅक्टिव सेशनला संबोधित करताना ओमारीने म्हटले की, भारताच्या दाैऱ्यावर जो सन्मान आणि मानपान मिळाला त्याने मला खूप जास्त आनंद झाला.

त्यांनी पुढे म्हटले की, भारतात दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विदेश मंत्रालय आणि ज्या ज्या लोकांची भेट झाली, त्यांनी मनापासून स्वागत केले. मला वाटले की, मी माझ्याच देशात आहे. आपल्या नात्यात कोणत्याही प्रकारची कुटनिती नाही तर इतिहास आणि एक संस्कृती आहे. आपला डीएनए देखील एकच आहे. भारताने ज्यापद्धतीने स्वागत केले ते अफगाणिस्तानच्या लोकांसाठी नवीन किरण घेऊन आले.

भारताने जो सन्मान केला, त्यावरून अफगाणिस्तानच्या लोकांचे भविष्य चांगले होईल, अशी आशा आहे. 80 टक्के आमचा देश कृषी आणि पशुपालनावर आधारित आहे. आता वेळ आली की, या क्षेत्रांना आधुनिकिकरणाची जोड मिळण्याची. या दिशेने भारत आमचा महत्वाचा भागीदार बनला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव आहे. यादरम्यानच अफगाणिस्तानने भारताबद्दल असे विधान केले की, नक्कीच पाकिस्तानला मिरच्या लागल्या असतील.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानवर हल्ला केला. या दोन्ही देशांच्या सीमेवर सतत तणाव बघायला मिळत आहे. एका रूग्णालयावर पाकिस्तानने हल्ला केला होता. यादरम्यान भारताने अफगाणिस्तानला मेडिकल मदतही पाठवली होती. पाकिस्तान याच मुद्द्यात भारतावर गंभीर आरोप करताना दिसतो.

Follow Us