AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D-Mart : डीमार्टमध्ये शिरल्यावर गृहिणी पहिली ही गोष्ट करतात..तुम्ही कधी मार्क केलंय का?

डीमार्ट हे गृहिणींसाठी खरेदीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे गेल्यावर महिलांची पहिली पसंत किराणा सामान खरेदीला असते. धान्य, डाळी, मसाले, तेल, साबण अशा गरजेच्या वस्तू त्या घेतात. विशेष म्हणजे, त्या नेहमी 'सेल कुठे आहे?', 'एकावर एक फ्री' किंवा 'डिस्काऊंट' असलेल्या वस्तूंना प्राधान्य देतात. पैशांची बचत करून कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.

D-Mart : डीमार्टमध्ये शिरल्यावर गृहिणी पहिली ही गोष्ट करतात..तुम्ही कधी मार्क केलंय का?
डीमार्टला गेल्यावर गृहिणी काय खरेदी करतात ?
| Updated on: Jul 11, 2026 | 3:13 PM
Share

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात अनेकांना चौपाट्यांवर जाऊन पावसाचं आनंद घेण्याची लहर येते. कुणाला धबधब्याच्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करण्याची लहर येते. तर कुणाला घरीच मस्त चमचमीत पदार्थ बनवून खाण्याची लहर येते, तर कुणाला शॉपिंग करण्याची लहर येते. शॉपिंगसाठी मात्र डीमार्ट, शीमार्ट, मॉल आणि बिग बाझार असे पर्याय सर्वोत्तम वाटतात. त्यातही लोक अनेकदा डीमार्टला जाणच पसंत करतात. गर्दी कमी आणि निवांत खरेदी करता येते, त्यामुळे अनेकजण सोपा पर्याय म्हणून डीमार्टला जात असतात. खासकरून गृहिणींची पहिली पसंत डीमार्टच असते.

पण डीमार्टला गेल्यावर गृहिणी काय खरेदी करतात? कशाची खरेदी करतात हे माहीत आहे का तुम्हाला? कधी मार्क केलंय का तुम्ही? मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही हजारदा पाहिलं असेल. पण ते तुमच्या लक्षात आलं नसेल. गृहिणी डीमार्टमध्ये गेल्यावर सर्वात आधी एक गोष्ट खरेदी करतात. किंबहुना त्यासाठीच गृहिणी डीमार्टला जात असतात. डीमार्टमध्ये गृहिणी सर्वात आधी किराणा सामान खरेदी करतात. खरं तर त्या डीमार्टमध्ये किराणा सामानच खरेदीसाठी जात असतात. स्वत:ला काही खरेदी करण्यासाठी त्या जात नाहीत. त्यामुळे त्या डीमार्टला गेल्यावर पहिली गोष्ट करतात ती म्हणजे सेल कुठे आहे? एकावर एक वस्तू कुठल्या सेक्शनला फ्रि आहे? डिस्काऊंट कुठल्या काऊंटरला मिळेल, हे शोधण्याचं काम त्या करतात.

सूट हवी सूट…

डीमार्टला गेल्यावर धान्य, डाळी, मसाले, साखर आणि तेल आदी किराणा माल त्या घेतात. साबण, डिटर्जंट, कोलगेट, क्लिनिंग पावडर आदी वस्तू खरेदी करतात. त्याला कारण म्हणजे डीमार्टमध्ये या वस्तूंवर ऑफर असते. बाय वन गेट वन किंवा 10 टक्के सूट. किंवा साखरेवर चमचा फ्री. अशा प्रकारच्या ऑफर्स असल्याने पैशाची बचत होते. स्वस्तातील खरेदी होते, म्हणून महिला या वस्तू खरेदी करण्यावर भर देत असतात.

ज्याची गरज तेच…

त्यानंतर महिलांचा मोर्चा असतो तो तांदूळ, गहू, मसाले, पोहे, शेंगदाणे, रवा आणि इतर वस्तू खरेदी करण्याकडे. घरासाठी लागणारी भांडी त्या बेताच्याच घेतात. जेवढ्या गोष्टींची गरज आहे, तेवढ्याच घेण्यावर त्यांचा भर असतो. या वस्तू घेताना त्यातल्या त्यात स्वस्तातील वस्तू कोणत्या आहेत? यावर त्यांचं लक्ष असतं. कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करायचं असतं. त्यामुळे कमी खर्चात जास्तीचं सामान खरेदी करण्यावर त्यांचा भर असतो.

सेलवर नजर

डीमार्टमध्ये कपडे स्वस्त असतात. लहान मुलांचे कपडे अधिक स्वस्त असल्याने तेही घेण्यावर त्यांचा भर असतो. शिवाय या महिलांचं लक्ष पावसाळी, दिवाळी आणि इतर सीजनल सेलवर लक्ष असतं. सेलच्या काळात अधिकाधिक वस्तू खरेदी करण्यावर त्यांचा भर असतो. जेणेकरून पैशाची बचत होईल, हे त्यामागचं गणित असतं. इतर वायफळ खर्च टाळण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे शक्यतो मुलांना घेऊन त्या डीमार्टला जात नाहीत. मुलं असल्यावर पैशांची उधळपट्टी होत असल्याने त्या मुलांना सोबत न नेण्याची खरबदारी घेतात.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार