अफगाणिस्तानची पाकिस्तानला मोठी चपराक, तालिबानचे जोरदार प्रत्यूत्तर

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एक आत्मघातकी हल्ला झाला होता ज्यामध्ये ५ चीनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे अफगाणिस्तानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. पण पाकिस्तानच्या या आरोपावर तालिबानने जोरदार उत्तर दिले आहे.

अफगाणिस्तानची पाकिस्तानला मोठी चपराक, तालिबानचे जोरदार प्रत्यूत्तर
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 7:27 PM

तालिबानने बुधवारी पाकिस्तानमधील हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग असल्याचा दावा फेटाळून लावलाय. पाकिस्तानचा हा दावा ‘बेजबाबदार आणि असत्य असल्याचे तालिबानने म्हटले आहे. मार्चमध्ये पाच चिनी अभियंते आणि एक पाकिस्तानी ड्रायव्हर या हल्ल्यात ठार झाले होते. या आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची योजना अफगाणिस्तानमध्ये रचली गेली होती असा आरोप पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले की, खैबर पख्तूनख्वामधील बिशाम जिल्ह्यात २६ मार्च रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

“अशा घटनांसाठी अफगाणिस्तानला दोष देणे हा हे सत्यापासून लक्ष विचलित करण्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचे तालिबानने म्हटले आहे. आम्ही हे ठामपणे नाकारतोय, तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खवरझमी यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानी लष्कराची आणि सुरक्षा यंत्रणांची कमजोरी दिसून येते. इस्लामिक अमिरातीने (अफगाणिस्तान) चीनला आश्वासन दिले आहे की त्यांचा यात समावेश नाही.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी म्हटले होते की, अफगाण तालिबानने सत्तेत येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेले आश्वासन पाळता आले नाही. असे त्यांनी म्हटले आहे. तर पाकिस्तानातून इस्लामिक स्टेटचे सदस्य अफगाणिस्तानात आल्याचे अफगाणिस्तानकडे पुरावे आहेत आणि “पाकिस्तानची माती आमच्या विरोधात वापरली जात आहे, ज्यासाठी पाकिस्तानने उत्तर दिले पाहिजे” असे खव्राजमी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानमध्ये झालेल्या या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. चीनच्या नागरिकांच्या ताफ्यावरउत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला होता. या बॉम्बस्फोटात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

चिनी अभियंत्यांचा ताफा इस्लामाबादहून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दासू कॅम्पमधून जात असताना ताफ्याला आत्मघातकी हल्लेखोराने लक्ष्य केले. या घटनेने पाकिस्तानात परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. ज्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर द्यावे लागले होते. आता पाकिस्तान या हल्ल्याचे खापर अफगाणिस्तानवर फोडू पाहत होता. पण त्याला अफगाणिस्तानने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.