दोन लग्न करावेच लागतील, नकार दिल्यास तुरुंगवास भोगावा लागेल, ‘या’ देशातील कायदा

जगभरातील देशांच्या आपापल्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या जीवनशैली आहेत. लग्नाचे नियमही वेगवेगळे आहेत. मात्र जगात एक असा देश आहे जिथे दोन विवाह करणे बंधनकारक आहे.

दोन लग्न करावेच लागतील, नकार दिल्यास तुरुंगवास भोगावा लागेल, ‘या’ देशातील कायदा
marriage
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 08, 2025 | 1:49 PM

कुणी तुम्हाला म्हटलं दोन लग्न करावेच लागतील, तर तुमची काय अवस्था असेल. पण, तुम्हाला महिती आहे का की, एका देशात असा कायदा आहे की दोन लग्न करावेच लागतील. दोन लग्न न केल्यास कारवाई होऊ शकते. तरुंगवास देखील सोसावा लागू शकतो. हो. आम्ही सत्य बोलत आहोत. जगात एक असा देश आहे जिथे दोन विवाह अनिवार्य मानले जातात. जर त्या व्यक्तीने दोन विवाह केले नाहीत तर त्यावर काय कारवाई होते, याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

या देशात मुलींना लग्नासाठी विविध आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. लग्न करणाऱ्या व्यक्तीला तीन लाख रुपये देण्याची योजना सरकारने आणली आहे, शिवाय बाहेरच्या व्यक्तीने मुलीशी लग्न केल्यास त्याला नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जगभरातील देशांच्या आपापल्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या जीवनशैली आहेत. खाण्या-पिण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. लग्नाचे विधीही वेगवेगळे असतात. काही लोकांना धुमधडाक्यात लग्न करायला आवडतं तर काही लोक शांततेत लग्न करतात. शाही विवाहांविषयीही बरीच चर्चा होत असते, पण तुम्हाला माहितच आहे की जगात एक असा देश आहे जिथे दोन विवाह अनिवार्य मानले जातात. जर त्या व्यक्तीने दोन विवाह केले नाहीत तर त्याला तुरुंगातही टाकले जाते.

आफ्रिका खंडात वसलेल्या इरिट्रियामध्ये सर्व पुरुषांना दोन विवाह करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन विवाह न करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगातही टाकले जाऊ शकते. त्यासाठी येथील सरकारने कायदाही केला आहे. त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याशिवाय पहिल्या पत्नीने विरोध केल्यास तिला शिक्षाही होऊ शकते.

हा कायदा करण्यामागे काही कारणे आहेत. या देशात महिलांची लोकसंख्या जास्त आहे. ज्यामुळे पुरुषांना दोन वेळा लग्न करण्यास भाग पाडले जाते. या देशात जेव्हा हा कायदा करण्यात आला तेव्हा जगभरात त्यावर टीका झाली असली तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम होते.

इरिट्रिया व्यतिरिक्त आईसलँडमध्येही मुलींना लग्नासाठी विविध आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. लग्न करणाऱ्या व्यक्तीला तीन लाख रुपये देण्याची योजना सरकारने आणली आहे, शिवाय बाहेरच्या व्यक्तीने मुलीशी लग्न केल्यास त्याला नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लग्नाच्या नियमांव्यतिरिक्त असे अनेक विचित्र कायदे इथे आहेत. ज्यावर लोक प्रतिक्रिया देतात.