AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Hindu : सरकार बदललं पण.. प्रभू रामचंद्रांवरुन बांग्लादेशकडून हिंदुंच्या भावनांचा अपमान, तिथे लोक चिडून रस्त्यावर उतरले

Bangladesh Hindu : बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झालं आहे. तारिक रहमान पंतप्रधान असून त्यांच्या पक्षाचं सरकार आहे. पण हिंदूविरोधी निर्णय मात्र थांबलेले नाहीत. आता तारिक सरकारचा कारभार सुद्धा युनूस यांच्यासारखाचं आहे.

Bangladesh Hindu : सरकार बदललं पण.. प्रभू रामचंद्रांवरुन बांग्लादेशकडून हिंदुंच्या भावनांचा अपमान, तिथे लोक चिडून रस्त्यावर उतरले
tarique rahmanImage Credit source: Facebook
| Updated on: Jun 24, 2026 | 2:01 PM
Share

शेजारच्या बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झालं आहे. तारिक रहमान पंतप्रधान बनले. बांग्लादेशात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथियांच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा होती. पण असं घडताना दिसत नाहीय. उलट हिंदुंना रोखलं जातय. बांग्लादेशच्या गाइबांधामध्ये प्रभू रामचंद्रांचा 81 फूट उंच पुतळा उभारणीला स्थगिती देण्यात आली आहे. मानवाधिकार संघटना JMBF ने या बद्दल चिंता व्यक्त केली. इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दबावाखाली सरकाराने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर बांग्लादेशात हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले.

प्रभू रामचंद्रांच्या पुतळा उभारणीला स्थगिती दिल्यानंतर बांग्लादेशातील हिंदू समुदायाने रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन केलं. मशाल हाती घेऊन या निर्णयाचा निषेध केला. बांग्लादेश सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना लगाम घालून आणि हिंदू अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करेल असा विश्वास भारताने व्यक्त केला आहे.

ही घटना बांग्लादेशचं संविधानाच्या विरोधात

या महिन्याच्या सुरुवातीला मंदिरात मुर्ती बनवण्याचा विषय समोर येताच स्थानिक इस्लामिक संघटनेने जोरदार विरोध केला असं मानवाधिकार संघटना जस्टिस मेकर्स बांग्लादेश इन फ्रान्सने म्हटलं आहे. विरोधासाठी रॅली काढण्यात आल्या. पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. सरकारी अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिले. वातावरण खराब झाल्याने आणि हिंसेच्या भितीने मंदिर प्रशासनाने 12 जून रोजी मुर्ती निर्माणाचं काम थांबवलं. हिंदू समुदायाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न झाल्याने काम थांबवण्यात आलं. ही घटना बांग्लादेशचं संविधान आणि जगातील मानवाधिकार नियमांच्या विरुद्ध आहे. संघटनेने कुठल्याही पक्षपाताशिवाय निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

धार्मिकतेच्या आधारावर अल्पसंख्यांकाना वारंवार टार्गेट

बांग्लादेशात धार्मिकतेच्या आधारावर अल्पसंख्यांकाना वारंवार टार्गेट केलं जातं. मागच्या काही वर्षात सांप्रदायिक हिंसाचार आणि पूजा स्थळांवर हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशांततात आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने बांग्लादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मात्र, तरीही गोष्टी सुरळीत झालेल्या नाहीत.

Follow Us
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक