Trump-Modi Meet : भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव, लवकरच मोदींना भेटणार, कुठे,कधी त्याची माहिती आली समोर
Trump-Modi Meet : भारताबद्दल अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी नकारात्मक टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मायदेशात मोठी टीका झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी मोठा दबाव आहे. लवकरच ते पीएम मोदी यांना भेटणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जून महिन्यात भेट होऊ शकते. G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प फ्रान्सला जाणार आहेत. दोन्ही बाजू या बैठकीसाठी तयारी करत आहेत. पीएम मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारताचा दौरा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो मे महिन्यात दिल्लीला येणार आहेत. रुबियो यांच्या दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांच्या बैककीची रुपरेषा ठरवली जाईल. मोदी आणि ट्रम्प यांची शेवटची भेट फेब्रुवारी 2025 मध्ये झाली होती. टेलिफोनवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असते. G-7 सम्मेलन फ्रान्सच्या Evian येथे होणार आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. ट्रम्प यांच्या G7 परिषदेत सहभागी होण्याबद्दल अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे. पण तयारी सुरु आहे. भारताबद्दल ट्रम्प यांनी नकारात्मक टिप्पणी केली. त्यामुळे संबंधात तणाव आहे. अमेरिकेला दोन्ही देशांमध्ये पडलेलं हे अंतर कमी करायचं आहे. भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव आहे. ट्रम्प यांच्या पाकिस्तान प्रेमामुळे गोष्टी बिघडत चालल्या आहेत.
ते माझे मित्र आहेत
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत असं म्हटलं. भारतीय नेत्यांसोबत चांगली चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. पश्चिम आशिया आणि क्षेत्रीय सुरक्षेशी संबंधित चिंता, कूटनितीक घडामोडी या संदर्भात ही चर्चा झाली. “माझी त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. ते माझे मित्र आहेत. ते चांगलं काम करत आहेत. आमची चांगली चर्चा झाली” असं राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले.
रणनितीक मुद्यांवर चर्चा
राष्ट्रपती ट्रम्प यांचा मला फोन आलेला, या मोदी यांच्या वक्तव्यानंतर ट्रम्प यांनी हे स्टेटमेंट केलं. चर्चेत दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील स्थितीचा आढावा घेतला. समुद्री सुरक्षेसह महत्वाच्या रणनितीक मुद्यांवर चर्चा केली. ट्रम्प यांच्यामुळे सध्या भारत-अमेरिका संबंध बिघडले आहेत.