India-Pakistan : भारताच्या नुसत्या ट्राई-सर्विसेज अभ्यासाला टरकला पाकिस्तान, घाबरुन कुठला मार्ग केला बंद?

India-Pakistan : ऑपरेशन सिंदूरच्या आठवणी अजूनही पाकिस्तानच्या मनात ताज्या आहेत. त्यावेळी भारताने पाकिस्तानला काही कळू न देता घाव घातला होता. आता भारताने नुसत्या ट्राई-सर्विसेज अभ्यासाची घोषणा केल्यानंतर पाकिस्तान टरकला आहे.

India-Pakistan : भारताच्या नुसत्या ट्राई-सर्विसेज अभ्यासाला टरकला पाकिस्तान, घाबरुन कुठला मार्ग केला बंद?
Indian Forces
| Updated on: Oct 28, 2025 | 3:21 PM

भारताच्या मोठ्या त्रि-सेवा सैन्य अभ्यासाच्या (Tri-Services Exercise) तयारीने पाकिस्तान खळबळ उडाली आहे. भारत नुसता सराव करणार आहे. पण पाकिस्तानच्या मनात भिती आहे. भारताच्या या सैन्य सरावाला घाबरलेल्या पाकिस्तानने आपल्या देशातील अधिकांश हवाई मार्ग अस्थायी बंद केले आहेत. पाकिस्तानने NOTAM (Notice to Air Missions) जारी करुन 28 आणि 29 ऑक्टोंबर पर्यंत एअर रुट्स बंद केले आहेत. इस्लामाबाद, लाहोर, रहिम यार खान आणि लाइन ऑफ कंट्रोल जवळच्या भागात नोटॅम लागू करण्यात आला आहे. भारताच्या सैन्य सरावाला सुरुवात होण्याआधी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

हा NOTAM वेगवेगळ्या क्षेत्रात लागू करण्यात आला आहे. इस्लामाबाद आणि अफगाणिस्तानच्या सीमा क्षेत्रात 28 ऑक्टोंबर 07:00 UTC ते 29 ऑक्टोंबर 10:00 UTC पर्यंत NOTAM लागू राहिलं. लाहोर क्षेत्रात 28 ऑक्टोंबर 00:01 UTC ते 29 ऑक्टोंबर 04:00 UTC पर्यंत नोटॅम असेल. याआधी सुद्धा पाकिस्तानने एक Notam जारी केलेला. हे दुसरं नोटॅम पाकिस्तानने जारी केलय.

28,000 फूट उंचीपर्यंतचं हवाई क्षेत्र आरक्षित

भारताने 30 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत अरबी समुद्रात 28,000 फूट उंचीपर्यंतचं हवाई क्षेत्र आपल्या त्रि-सेवा युद्धाभ्यासासाठी आरक्षित केलय. या सरावात भारतीय पायदळ, नौदल आणि हवाई दल एकत्र सहभागी होणार आहे. भारताचं प्रमुख (ट्राय-सर्विस) युद्धाभ्यास एक्स त्रिशूल (Ex Trishul) आहे. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाचं संयुक्त संचालन,बहु-क्षेत्रीय अंतरसंचालन आणि युद्ध तयारीचं परीक्षण करण्यासाठी हा युद्धभ्यास केला जात आहे.


पाकिस्तानची घबराट दिसते

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या निर्णयातून त्यांची घबराट आणि सावधता दिसून येते. भारताचा हा सराव क्षेत्रीय सुरक्षा आणि समन्वय क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे.