अमेरिका, युरोपची इस्रायलला भक्कम साथ, पण चीन, रशिया तितक्याच खंबीरपणे इराणच्या मागे का नाहीत?

इस्रायल-इराण युद्धात कोणकोणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट झालय. अमेरिका आधीपासूनच इस्रायल सोबत होती. पण इस्रायलवर टीका करणारे युरोपियन देशही त्यांच्या बाजूने आलेत. पण इराण आज एकटा पडला आहे. चीन, रशिया इराणच्या बाजूने बोलले. पण त्यांनी तितक्याच ठामपणे इराणची साथ का नाही दिली?

अमेरिका, युरोपची इस्रायलला भक्कम साथ, पण चीन, रशिया तितक्याच खंबीरपणे इराणच्या मागे का नाहीत?
इस्त्रायल इराण युद्ध
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 17, 2025 | 3:30 PM

इराणची राजधानी तेहरानमध्ये आज लाखोंच्या संख्येने लोक घरदार सोडून निघाले आहेत. ज्याला जिथे जागा मिळतेय, तिथे तो पळतोय. कोणाला तेहरानमध्ये राहयचं नाहीय. इस्रायली मिसाइल्स आणि ड्रोन्सचा दरदिवशी कहर सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा इराणी लोकांना तेहरान सोडण्याचा इशारा दिला आहे. याचाच अर्थ इराणवर मोठी कारवाई होणार हे स्पष्ट आहे. इराणचे अनेक बडे नेते, अधिकारी आणि वैज्ञानिक मारले गेलेत. आज जगात इराणबद्दल सहानुभूती ठेऊन असणारे कमी देश उरले आहेत. इस्लामी जगातूनही इराणला समर्थन मिळत नाहीय. रशिया आणि चीन सुद्धा इराणच्या बाजूने ठामपणे उभं राहणं टाळत आहेत.

मध्य आशियात आज सौदी अरेबिया, यूएई, कुवैत असे मुस्लिम देश आहेत, जे शांततामय मार्गाने प्रगतीला आपलं लक्ष्य मानतात. पण इराण असा देश नाहीय. आज युरोप, अमेरिकेला वाटतं, इराणच्या हाती अणवस्त्र पडू नयेत, तर त्यामागे काही ठोस कारणं आहेत. इराण बऱ्याच वर्षांपासून दहशतवादी संघटनांना खतपाणी घालत आलाय. यात हिजबुल्लाह (लेबनान), हमास आणि पॅलेस्टाइन इस्लामिक जिहाद (गाजा), हूती बंडखोर (येमेन) आणि इराकी शिया मिलिशिया यांचा सहभाग आहे. या समूहांना इराणकडून शस्त्र, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळतं. ज्याचा उपयोग ते क्षेत्रात अस्थिरता निर्माण करण्यासाठी करतात.

रशियाने इराणला खंबीर साथ का नाही दिली?

रशिया 2022 पासून युक्रेन युद्धात व्यस्त आहे. त्यांची सैन्य आणि आर्थिक ताकद कमजोर झाली आहे. रशियासाठी मध्यपूर्वेत नव्या युद्धाची सुरुवात करण एका धोकादायक पाऊल आहे. त्यामुळे रशियाने इराणला S-300 एअर डिफेन्स सिस्टिम आणि शाहेद-136 ड्रोन्ससारखी शस्त्र दिली. पण सध्या सुरु असलेल्या युद्धात रशियाने फक्त कूटनितीक स्टेटमेंट केली. रशियाने इस्रायलचा फक्त निषेध केला किंवा UNSC मध्ये इमर्जन्सी बैठकीची मागणी केली. पण इस्रायलशी थेट संघर्ष टाळला. कारण त्यामुळे अमेरिका आणि नाटोबरोबर संघर्ष करावा लागेल.
रशियाला मध्य पूर्वेत अमेरिकेचा प्रभाव कमी करायचा आहे. पण त्यांना सध्या आपली सर्व ऊर्जा यूक्रेन आणि युरोपभोवती केंद्रीत ठेवायची आहे. रशियाने इराणपासून तेवढं अंतर राखलं.

चीनची भूमिका काय?

चीनने सुद्धा इस्रायलच्या कारवाईची निंदा केली. इराणची संप्रभुता आणि क्षेत्रीय अखंडतेच समर्थन केलं. पण त्यांना सैन्य मदत केली नाही. रशिया आणि चीनने UNSC मध्ये इराणच समर्थन केलं. पण हे प्रस्ताव सैन्य समर्थनाऐवजी कुटनितीक होते. म्हणजे आज अमेरिका आणि युरोप जितक्या ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभं आहे. रशिया-चीन तितक्या ताकदीने इराणच्या मागे नाहीत.