
कंबोडियाने देखील आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल मिळावे यासाठी नामांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंबोडीयाचे उप पंतप्रधान म्हणाले की ट्रम्प यांनी कंबोडीया आणि थायलंड दरम्यान सीमेवरील संघर्ष संपवण्यात मदत केली आहे. त्यामुळे कंबोडिया ट्रम्प यांच्या या योगदानामुळे त्यांना शांततेचे नोबेल मिळावे यासाठी नॉमिनेट करण्याची प्लानिंग करीत असल्याचेही कंबोडीयाने म्हटले आहे.
कंबोडियाचे उप पंतप्रधान सन चानथोल यांनी गुरुवारी एका मुलाखत सांगितले की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ताक्षेपाशिवाय कंबोडिया आणि थायलंड दरम्यानचा वाद संपविण्यासाठी कदाचित कोणताही करार घडणे कठीण होते. दोन देशात झालेल्या संघर्षात किमान ४५ लोक ठार झाले आहेत.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात दोन्ही देशांना इशारा दिला की युद्ध समाप्त करण्यासाठी कोणताही करार नाही केला तर त्यांच्यावर रेसिप्रोकल टैरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की जर दोघात सामजंस्य झाले तर दोन्ही देशांवर टैरिफ कमी करण्यात येईल.
त्यानंतर सोमवारी कंबोडिया आणि थायलंडच्या नेत्यांनी मलेशियाची राजधानी क्वाआलालंपुरमध्ये झालेल्या बैठकीत युद्धसमाप्तीवर सहमती दर्शविली. काही छोट्यामोट्या चकमकीच्या बातम्या वगळता दोन्ही देशात युद्धविराम जवळपास कायम आहे.
कंबोडियाचे उप पंतप्रधान सन चानथोल यांनी सांगितले की, ‘त्यांना केवळ कंबोडियातील त्यांच्या कामासाठीच नव्हे तर इतर जागीही त्यांच्या योगदानासाठी नोबेल मिळायला हवे’ ते पुढे म्हणाले की कंबोडीयन सरकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे नाव पुरस्कार देणाऱ्या नॉर्वेच्या नोबेल कमिटीच्यासमोर ठेवण्याची योजना आखत आहे.
गुरुवारी रात्री उशीरा ट्रम्प प्रशासनाने घोषणा केली होती की थायलंडसारखा कंबोडियावर देखील अमेरिकतून आयातीवर १९ टक्के टैरिफ लावला जाईल. जो आधीच्या ३६ टक्के प्रमाणाच्या खूपच कमी आहे. ट्रम्पनी आधी कंबोडियावर ४९ टक्क टैरिफची घोषणा केली होती. जो जगातील सर्वाधिक टैरिफ आहे. परंतू आता तो घटून १९ टक्के झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष ओबामा सारखे ट्रम्प यांनीही नोबेल पुरस्कार मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणि त्यांच्या या आकांक्षेचे समर्थन जगातील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे त्यांना खुष करण्याचे साधन बनले आहे. वास्तविक ट्रम्प अजूनही गाझा आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले यु्द्ध समाप्त करण्यात अपयशी ठरले आहेत. कंबोडियाच्या आधी इस्राईल आणि पाकिस्तान यांनी ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. अनेक आफ्रीकन देशांनी देखील ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.