पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा डाव, मुस्लिम देशांना एकत्र करून भारताचा गेम करण्याची तयारी, यूएई आणि कतार..

Muslim countries against India : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून मोठी कारवाई केली, त्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानला समजले की, आपण भारताच्याविरोधात लढू शकत नाहीत. यामुळे पाकिस्तानने आता मुस्लिम देशांकडे धाव घेतली आहे.

पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा डाव,  मुस्लिम देशांना एकत्र करून भारताचा गेम करण्याची तयारी, यूएई आणि कतार..
Saudi Arabia and Pakistan
| Updated on: Sep 20, 2025 | 8:11 AM

पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारताने इतकी जास्त आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करत मोठा हल्ला केला. ज्यामुळे अनेक पर्यटकांचे जीव गेले. पहलगाम हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला. काहीही करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी धडा शिकवा अशी मागणी लोकांकडे केली जात होती आणि संताप प्रचंड वाढला. या हल्ल्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करत धर्म विचारून गोळ्या झाडल्या. भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात राबवत पाकिस्तानमधून घुसून थेट दहशतवाद्यांची अड्डे पूर्णपणे उद्धवस्थ केली.

आता पाकिस्तानची झोप उडाली असून भारतावरील दबाव वाढवण्यासाठी इतर मुस्लीम देशांसोबत सुरक्षेचे करार केली जात आहेत. साैदी अरेबियासोबत महत्वाचा करार नुकताच पाकिस्तानने केला. ज्यामुळे थोडक्यात काय तर पाकिस्तानवर हल्ला म्हणजे साैदी अरेबियावर हल्ला असे समजले जाईल. आता पाकिस्तान अजून काही मुस्लीम देशांना गळ्याला लावताना दिसतोय. मात्र, काही देशांनी पाकिस्तानला उभे देखील केले नाही.

याच पार्श्वभूमीवर भारताने देखील थेट मोठा इशारा दिला ज्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानची साथ दिली नाहीये. पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफने दावा केला की, अजूनही काही मुस्लीम देश हे पाकिस्तानसोबत सुरक्षेचा करार करणार आहेत. मात्र, भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानसोबत संरक्षण करार करण्यास यूएई आणि कतर यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.

भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी अगोदरच स्पष्ट केले की, भारत आणि साैदीमध्ये अनेक वर्षांपासून चांगले व्यापारी संबंध आहेत. या कराराबद्दल आपल्याला अगोदरच माहिती होती. भारत हा त्याच्या सुरक्षेवर अधिक भर देणार आहे. पाकिस्तान आणि साैदी यांच्यातील संरक्षण करार म्हणजे एका नव्या गोष्टीला सुरूवात झाल्याचे बघायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्लानंतर भारताची आक्रमक भूमिका पाहून पाकिस्तानला एकप्रकारचा मोठा धक्काच बसला. त्यानंतर पाकिस्तानने आता धावपळ सुरू केली असून संरक्षण करार करण्यावर भर दिलाय.