डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी मोठा बॉम्ब, टॅरिफनंतर नवा धक्कादायक निर्णय घेणार!

ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर भरभक्कम टॅरिफ म्हणजेच आयातशुल्क लावले आहे. ट्रम्प यांच्या या एका निर्णयामुळे भारतातील व्यापारावर नकारात्मक प्रभाव पडलेला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या या पहिल्या झटक्यानंतर आता भारतासह इतर देशांनाही ते दुसरा मोठा झटका देण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी मोठा बॉम्ब, टॅरिफनंतर नवा धक्कादायक निर्णय घेणार!
donald trump
| Updated on: Aug 14, 2025 | 7:16 PM

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. त्यांनी भारतासह अनेक देशांवर भरभक्कम टॅरिफ म्हणजेच आयातशुल्क लावले आहे. ट्रम्प यांच्या या एका निर्णयामुळे भारतातील व्यापारावर नकारात्मक प्रभाव पडलेला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या या पहिल्या झटक्यानंतर आता भारतासह इतर देशांनाही ते दुसरा मोठा झटका देण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे भारतातील तसेच जगभरातील तरुणांचे अमेरिकेत जाऊन पैसे कमवण्याची स्वप्न अधुरे राहू शकते.

अमेरिका नेमका कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार पारंपरिक H-1B व्हिसा पद्धतीला आता वेज-बेस्ड सिलेक्शन सिस्टिमध्ये बदलण्याचा विचार करत आहे. या निणयामुळे भारतातील तसेच जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी तसेच नुकतेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यात अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. जास्त पगार असणाऱ्या नोकरदारांनाच प्राधान्य देण्यासाठी अमेरिका हा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत जाऊन करिअर घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदवीधर किंवा एन्ट्री लेव्हलचे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

वेज बेस्ड सिलेक्शन सिस्टिम नेमकी काय आहे?

सध्याच्या नियमानुसार H-1B व्हिसा लॉटरी पद्धतीने दिला जातो. हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचा पगार किती आहे याचा विचार केला जात नाही. म्हणजेच जास्त पगार असणाऱ्या आणि कमी पगार असणार्‍या दोघांनाही हा व्हिसा मिळण्यासाठी समान संधी दिली जाते. या H-1B व्हिसाअंतर्गत नव्यानेच पदवीधर झालेल्या किंवा अनुभवी नोकरादांना अमेरिकेत करिअर गडवण्यासाठी संधी दिली जाते.

नव्या प्रस्तावित नियमानुसार काय होणार?

आता मात्र नव्या प्रस्तावानुसार H-1B हा व्हिसा देताना अर्जदाराच्या पगाराचा विचार केला जाईल. म्हणजेच ज्या लोकांना जास्त अनुभव आता त्याच लोकांना हा व्हिसा मिळण्याची जास्त संधी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर एन्ट्री लेव्हल आणि कमी पगार असलेल्या अर्जादरांना हा व्हिसा मिळण्याची शक्यता कमी असेल.

या प्रस्तावित निर्णयामुळे आता भारतातील नागरिकांसह जगभरातील इतर देशांवरही याचा परिणाम पडू शकतो. त्यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.