AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार

इराण आणि अमेरिकेचे युद्ध काही केल्या संपेना अशी स्थिती आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भारताच्या एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आता एक नवा भिडू समोर आला आहे.

आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार
lpg gas cylinder
| Updated on: Aug 28, 2026 | 8:33 PM
Share

इराण आणि अमेरिका – इस्रायल युद्धाने होर्मुझ सामुद्रधुनीचा समुद्री मार्ग ठप्प झाल्याने देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक लोकांना याची झळ सोसावी लागली. इराण- अमेरिकेची बोलणी आता पुन्हा कधी सुरु होतील याचा कोणतीही शक्यता आता उरलेली नाही. त्यातच आता भारताला एलपीजीचा पुरवठा कायम राहावा यासाठी नव्या मित्रांना शोधावे लागले आहे. आता भारताला एलपीजी पुरवणारा नवा भिडू सापडला आहे. त्यामुळे अमेरिका, युएई नंतर हा तिसरा देश एलपीजी पुरवठ्यास भारताला मदतगार ठरला आहे.

कस्टम आणि जहाजांच्या येजा करण्यावर नजर ठेवणारी कंपनी केप्लरच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये आतापर्यंत अल्जेरियाने भारताला 1,10,711 टन LPG पाठवला आहे. हा ऑगस्टमध्ये भारताने आतापर्यंत आयात केलेल्या सुमारे 10.8 लाख टन LPG च्या सुमारे 10 टक्के आहे.

मिंटच्या बातमीनुसार ऑगस्टमध्ये अमेरिका हा भारताला LPG पाठवणारा सर्वात मोठा पुरवठादार होता. अमेरिकेने आतापर्यंत 6,22,536 टन LPG पाठवला आहे. तर संयुक्त अरब अमिरातने (UAE) 1,40,266 टन एलपीजी पाठवत दुसरा क्रमांक गाठला आहे. त्यानंतर आता अल्जेरियाचा क्रमांक लागला आहे. अल्जेरियातून भारताला सतत एलपीजीचा पुरवठा वाढत चालला आहे. अल्जेरियाची सरकारी कंपनी सोनाट्रॅक जगातील सर्वात मोठी एलपीजी निर्यातक कंपन्यांपैकी एक आहे. एलपीजीच्या निर्यातीच्या बाबतीत ही सरकारी कंपनी सौदीच्या अरामको कंपनीनंतर जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

भारताला अल्जेरिया का महत्वाचा

हा बदल भारतासाठी फायद्याचा आहे. भारत जगातला घरगुती एलपीजी खरेदी करणारा जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे. देशात सुमारे 34 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. भारताला दरवर्षी सुमारे 3.3 कोटी टन एलपीजीची गरज लागते. ज्यातील सुमारे 65 टक्के हिस्सा दुसऱ्या देशातून आयात केला जातो. या आयातीवर भारत सुमारे 11 अब्ज डॉलर खर्च करतो. भारताच्या एलपीजीच्या पुरवठ्याच्या सुमारे ९० टक्के हिस्सा पश्चित आशियाई देशातून येतो. अशा पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची येजा थांबल्याने भारताच्या एलपीजीवर परिणाम झाला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ