ट्रम्प यांच्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा मोदी यांना फोन, म्हणाले तुमच्या योगदानाचे कौतूक

पीएम मोदी यांनी एक्सवर पोस्ट करीत माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही केलेल्या फोन कॉल आणि हार्दिक शुभेच्छासाठी धन्यवाद.आमची विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

ट्रम्प यांच्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा मोदी यांना फोन, म्हणाले तुमच्या योगदानाचे कौतूक
pm modi and putin
| Updated on: Sep 17, 2025 | 7:49 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल ट्रम्प यांच्या पाठोपाठ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शुभेच्छाबद्दल पुतिन यांचे आभार मानले आहेत. आणि भारत आणि रशियाच्या संबंधाना मजबूत करण्यासाठीच्या प्रतिबद्धतेचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी भारत सर्वतोपरी योगदान देईल.एक्सवर पोस्ट करुन त्यांनी लिहिले की माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी माझ्या ७५ व्या वाढदिवसाबद्दल केलेला कॉल आणि शुभेच्छासाठी मी त्यांचे आभार मानतो. “आम्ही आमची विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी भारत सर्वतोपरी योगदान देण्यास तयार आहे.”

पुतिन यांनी मोदी यांना जन्म दिनाच्या शुभेच्छा देताना भारत आणि रशिया दरम्यानची भागीदारी आणखी मजबूत करण्यात त्यांच्या शानदार व्यक्तीमत्वाच्या योगदानाचे कौतूक केले. क्रेमलिन ( रशियाचे राष्ट्रपती भवन ) च्या वेबसाईटवर प्रकाशित शुभेच्छा संदेशात पुतिन यांनी सांगितले, ‘तुम्ही ( मोदी ) शासन प्रमुखाच्या रुपात कार्याद्वारे देशवासियांकडून उच्च सन्मान मिळवला आणि जागतिक मंचावर खास प्रभाव पाडला.’ पुतिन म्हणाले की मोदी यांच्या नेतृत्वात भारताने सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

पुतिन यांनी म्हटले की ‘,दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि विविध क्षेत्रात परस्पर फायदेशीर रशियन-भारतीय सहकार्य विकसित करण्यासाठी तुम्ही उत्कृष्ट वैयक्तिक योगदान देत आहात.’ पुतिन यांच्या शिवाय इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सह अनेक जागतिक नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्या शहरात झाला.

येथे पाहा पोस्ट –

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना फोनवरुन जन्म दिनाच्या शुभेच्छा दिल्या.टॅरिफ वादा दरम्यान दोन्ही देशात तणावाचे वातावरण निवळण्याचे दोन्ही देशाचे संबंध सुधारण्याची चिन्हे यामुळे वाटत आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की मोदी चांगले काम करत आहेत. युक्रेन युद्ध समाप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आपण मोदी यांचे आभार मानत आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

त्यांची शक्ती, त्यांचा दृढ संकल्प आणि लाखो लोकांचे नेतृत्व

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या सोबत काढलेला स्वत: चा फोटो एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलेय की त्यांची शक्ती, त्यांचा दृढ संकल्प आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता हे प्रेरणचे स्रोत आहेत. मैत्री आणि त्याच्या सन्मानासह मी त्यांना चांगले आरोग्य आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना करते आणि ज्यामुळे भारताला एका उज्ज्वल भविष्याकडे ते घेऊन जावोत आणि आमच्या देशा दरम्यान संबंध आणि मजबूत होऊ शकतील. भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले की,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे.’