
Liquor Consuming In Islam : इस्लाम धर्मात मद्यपान करणे हराम मानले जाते. मद्यपान केलयानंतर व्यक्तीचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते, असे असे इस्लाममध्ये मानले जाते. त्यामुळेच सौदी अरेबिया, कुवेत, पाकिस्तान यासारख्या देशांत मद्यविक्रीवर बंदी आहे. परंतु इस्लाममध्ये मद्यपान हराम असले तरी बऱ्याच मुस्लीम देशांत मद्यपान केले जाते. काही ठिकाणी तर मद्यपानाचे प्रमाणही वाढलेले आहे. काही मुस्लीम देसांत मद्यविक्रीच्या माध्यमातून पैशांची मोठी उलाढाल होते.
सौदी अरेबिया, कुवेत या दोन देशांत दारुवर पूर्णपणे बंदी आहे. परंतु बांगलादेश, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती यासारख्या मुस्लीम देशात एखादी गैरमुस्लीम व्यक्ती परवाना घेऊन ती मद्यविक्री करत असेल तर याला कायद्यानुसार संमती आहे. किर्गिजस्तान या मुस्लीम देशात मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. factsanddetails नुसार किर्गिजस्तान या देशातील बरेच मुस्लीम धर्मीय मद्यपान करतात. थंडीच्या काळात तेथे मद्यपानाचे प्रमाण वाढते. या देशात व्होडका या मद्यप्रकाराचे सर्वाधिक सेवन केले जाते. त्यानंतर बिअर, गोड वाईन, शॅम्पन या मद्याचेही सेवन केले जाते. येथे आनंदाच्या क्षणी व्होडका तर हमखास पिला जातो.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. हीच बाब लक्षात घेऊन येथे गैरमुस्लिमांना मद्यपान करण्यास मनाई नाही. या देशात मुस्लिमांसाठी मद्यपान करणे हराम आहे. परंतु गैरमुस्लीम रहिवासी आणि पर्यटकांना येथे मद्यप्राशन करण्यावर बंदी नाही. परवाना असलेल्ये रेस्टॉरंट्, हॉटेलध्ये योग्य ठिकाणी मद्यविक्री करण्यास तेथे परवानगी आहे.
पाकिस्तान देशाची निर्मिती झाल्यनंतर साधारण तीन दशकापर्यंत तेथे मद्याचे सेवन आणि मद्यविक्री करण्यास परवानगी होती. मात्र झुल्फिकार अली भुत्तो यांचे सरकार आलयानंतर त्यांनी मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. 1977 साली त्यांची सत्ता गेली. पण अजूनही पाकिस्तानात मद्यविक्रीवर बंदी आहे. तेथे मुस्लीम व्यक्तीला मद्याची निर्मिती, मद्यविक्री करता येत नाही. गैरमुस्लिमांना मात्र परवाना घेऊन मद्यविक्री करण्याची परवनागी आहे. व्यक्तीची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन तेथे मद्यविक्रीचा परवाना दिला जातो.